मुंबई

VIDEO! बोरिवलीतील इंद्रप्रस्था शॉपिंग सेंटरला भीषण आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 14 गाड्या दाखल

भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः मुंबईतील बोरीवली पश्चिम येथील इंद्रप्रस्था शॉपिंग सेंटरमध्ये भीषण आग लागण्याली दुर्घटना घडली आहे. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली असून सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 14 गाड्या दाखल झाल्या. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून सध्या कुलिंगचे काम सुरू आहे. बोरिवलीतील इंद्रप्रस्था शॉपिंग सेंटरमध्ये पहाटे 3 च्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळानंतर आगीने रौद्ररुप धारण करत संपूर्ण शॉपिंग सेंटरमध्ये आग लागली. 

आगीत कोणतीही जिवितहानी नाही - 

प्राथमिक माहितीनुसार, ही आग इमारतीच्या ग्राउंड प्लोअरवर लागली आहे. या भीषण आगीमुळे परिसरात धुराचे लोळ उडाले आहेत. या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अजूनही समोर आली नाही. तसेच, आगीच कारण अद्याप अस्पष्ट आहे. या आगीमुळे शॉपिंग सेंटरमधील सामानाचे मोठे नुकसान झाले आहे.

शॉपिंग सेंटरला लागलले्या आगीची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर, सकाळी ६ वाजता पहिल्यांदा 4 गाड्या त्यानंतर 13 वॉटर टँकर घटनास्थळी पोहोचले. सध्या तरी आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून कुलींगचे काम सुरू आहे. 

आगीसाठी रोबोटची मदती - 

बोरीवली के इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटरमध्ये लागलेली आग विझवण्यासाठी रोबोटची मदत घेतली जात आहे. मध्यरात्री जवळपास 3 च्या सुमारास ही आग लागली होती. फायर ब्रिगेडच्या टीम बेसमेंटमध्ये रोबोटच्या मदतीने नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्याआग नियंत्रणात असून शॉपिंग सेंटरमध्ये धुराचे लोळ निघत असल्याचे अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी प्र. सु. रहांगदळे यांनी सांगितले आहे.

-------------------------------------
(संपादन - तुषार सोनवणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT