मुंबई

मुंबईतील रुग्णालयेच आजारी पडताहेत का? आता या रुग्णालयातील कर्मचारीसुद्धा बाधित...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील महापालिकेच्या कान-नाक-घसा (ईएनटी) रुग्णालयातील 13 कर्मचाऱ्यांचा कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे एकूण 42 कर्मचाऱ्यांची चाचणी घेण्यात आली. त्यात १३ कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. बाधितांच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांना चाचणीचा दुसरा अहवाल येईपर्यंत क्वारंटाईन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

सेठ ए. जे. बी महापालिका नाक-कान-घसा रुग्णालयात सध्या कोरोनाच्या रुग्णांची तपासणी केली जाते. रुग्णालयातील काही कर्मचारी एका कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याचे समजले. या 42 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यापैकी सहा डॉक्टर, चार चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि तीन परिचारिका अशा 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर अन्य कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. 

पहिला अहवाल निगेटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णालय प्रशासनाने कामावर बोलावले असल्याने नाराजी पसरली आहे. दुसऱ्या चाचणीचा अहवाल येईपर्यंत कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्याची मागणी होत आहे. हे कर्मचारी कामावर आल्यास कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इमारत सील करा
ईएनटी रुग्णालयाच्या दोन मजली इमारतीत तब्बल 125 कर्मचारी काम करतात. त्यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली पाहिज. सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करून रुग्णालयाची इमारत सील करावी, अशी मागणी म्युनिसिपल मजदूर युनियनचे चिटणीस प्रदीप नारकर यांनी केली आहे. 

मार्गदर्शक तत्त्वांनुसार निर्णय घेण्यात येत आहेत. कोरोनाबाधित 13 कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू आहे. सर्व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे.
- डॉ. दीपिका राणा, प्रमुख वैद्यकीय अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नागपूर विमानतळावरील सुरक्षा मशिन्स पूर्ववत सुरू

SCROLL FOR NEXT