मुंबई : शहरात कोव्हिड-19 विषाणूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे मेडिकल स्टोअर्समध्ये ताप, सर्दी, खोकला व न्युमोनिया या आजारांवरील औषधे घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांचे नाव, मोबाईल क्रमांक व पत्ता नोंदवण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दिले आहेत. ही माहिती न घेतल्यास औषधांचे दुकान सील करण्याचा इशाराही एफडीएने दिला आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचे संकट अधिक गडद होत आहे. भीतीच्या सावटाखाली असलेले अनेक नागरिक मेडिकलमधून ताप, सर्दी, खोकला व न्युमोनिया यांसारख्या आजारांची औषधे घेऊन जात आहेत. सध्याच्या परिस्थतीत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशी औषधविक्री करणे चुकीचे आहे. औषध दुकानदारांसाठी एफडीएने संहिता आखून दिली आहे. या सहितेनुसारच औषधांची विक्री करावी. ग्राहकांची संपूर्ण माहिती घेऊन दररोज एफडीएच्या संकेतस्थळार टाकावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. निर्देशांचे काटेकोर पालन न केल्यास औषधांचे दुकान सील केले जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
महत्त्वाच्या सूचना
- औषधे देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मास्क वापरणे बंधनकारक.
- हातमोजे घालूनच ग्राहकांना औषधे द्यावीत.
- मास्क न बांधलेल्या ग्राहकांना औषधे देऊ नयेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.