File Photo 
मुंबई

सीमाभागात मराठीच्या प्रसारासाठी सरकारने घेतला हा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा. राज्याच्या सीमाभागात मराठी भाषेचा प्रचार व प्रसारासाठी उपक्रम राबवावेत, असे निर्देश मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांनी दिले आहेत. 

मराठी भाषा विभागाच्या विविध उपक्रमांची आढावा बैठक डॉ. विश्‍वजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी सादरीकरण केले. मराठी भाषा विभागांतर्गत राज्य मराठी विकास संस्था, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य मराठी विश्‍वकोश निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आदी विविध उपक्रमांचा आढावा डॉ. कदम यांनी घेतला.

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंबंधीचा प्रस्ताव केंद्राकडे प्रलंबित आहे; त्याचा पाठपुरावा करावा. त्यासाठी विविध क्षेत्रांतील मराठी मान्यवरांची मदत घेता येईल, असे निर्देश डॉ. कदम यांनी दिले. तरुण पिढीला मराठी भाषेची गोडी लागावी, यासाठी उपक्रम सुरू करावेत. मराठी चित्रपटसृष्टीचे मराठी भाषेला योगदान आहे. त्यामुळे या क्षेत्रातील गीतकार, पटकथाकारांना; तसेच संकेतस्थळांवर मराठीचा प्रसार करणाऱ्यांना पुरस्कार देण्याचाही विचार व्हावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

यूट्यूबवर बालगीते, कथा यांच्या छोट्या चित्रफिती तयार कराव्यात, असेही त्यांनी सांगितले. यावेळी मराठी भाषा विभागाच्या सहसचिव अपर्णा गावडे, राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालक मीनाक्षी पाटील, भाषा संचालक नंदा राऊत, मराठी विश्‍वकोश निर्मिती मंडळाचे सचिव हर्षवर्धन जाधव आदी उपस्थित होते.
An initiative for Marathi Language to spread Marathi across the border 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोनं स्वस्त! सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; उच्चांकापेक्षा ₹27 हजारांनी कमी, पाहा आजचा भाव

Jalgaon Crime : जळगाव हादरलं! गणपतीच्या तयारीदरम्यान सैनिकाच्या पत्नीनं 5 वर्षांच्या चिमुरड्यासह पंख्याला ओढणीच्या सहाय्याने घेतला गळफास

आशिया कपची ट्रॉफी जिंकली, पण टीम इंडियाची ‘ही’ कमकुवत बाजू आली समोर; ५ सामन्यांत १३ झेल सोडले, मुझुमदार म्हणाले- सुधारण्यासाठी मेहनत सुरू

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Rajaram Puri Ganesh Procession : पहिल्याच दिवशी ओलांडली आवाजाची मर्यादा राजारामपुरी गणेश आगमन मिरवणूक ; आकर्षक विद्युत रोषणाई, ‘सिग्नल’मुळे वेळेचे गणित बसले

SCROLL FOR NEXT