मुंबई, ता. 12 : ओमानच्या आखाताजवळ भर समुद्रात बिघडलेल्या व्यापारी नौकेला भारतीय युद्धनौका आयएनएस तलवार यावरील नौसैनिकांनी मदत केल्यानंतर ती पुढील प्रवासाला निघाली.
INS तलवार ही युद्धनौका सध्या ओमानच्या आखातात आहे. त्याच परिसरातून जात असलेली व्यापारी नौका एमव्ही नयन (M V Nayan ) हिचे इंजिन, जनरेटर, जीपीएस यंत्रणा, दिशादर्शक यंत्रणा आदी बाबी एकामागोमाग एक बंद पडत गेल्या. त्यामुळे नऊ मार्च पासून या नौकेचे दिशाहीन भरकटणे सुरु झाले.
महत्त्वाची बातमी : बलात्काराचा आरोप असलेल्या सावत्र वडिलांना सत्र न्यायालयाने नाकारला जामीन, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकार
या नौकेने पाठवलेला संदेश तलवारवर 11 मार्च रोजी मिळाला. तलवारवरून प्रथम हेलिकॉप्टरच्या साह्याने या व्यापारी नौकेची प्राथमिक हवाई पहाणी करण्यात आली. नंतर छोट्या बोटीतून सुसज्ज तंत्रज्ञ, नौसैनिकांसह अन्य आवश्यक बाबी पाठविण्यात आल्या.
या बोटीवरील सात कर्मचारी भारतीय असल्याचेही आढळून आले. तलवार वरील तंत्रज्ञांनी तेथे सात तास मेहनत करून बोटीचे इंजिन व जनरेटर सेट दुरुस्त केला. जीपीएस यंत्रणा सुरु झाल्यानंतर ती बोट पुढील प्रवासास निघून गेली.
INS talwar helped breakdown ship M V Nayan near oman and rescued on board crew
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.