ins trikand participates in sea phase international maritime exercise cutlass express 2023
ins trikand participates in sea phase international maritime exercise cutlass express 2023 sakal
मुंबई

INS Trikand : आयएनएस त्रिकंड 'कटलास एक्सप्रेस 2023' युद्धाभ्यासात सहभागी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस त्रिकंड 'कटलास एक्सप्रेस 2023' या आंतरराष्ट्रीय सागरी युद्धाभ्यास कार्यक्रमाचा भाग बनली आहे. या सागरी सरावात भारताव्यतिरिक्त जपान, ब्रिटन आणि अमेरिका इत्यादी देशांचा नौदलाचा सहभाग आहे.

आयएनएस त्रिकंड भारतीय नौदलाच्या वेस्टर्न फ्लीटचा एक भाग आहे. त्रिकंड ही एक अत्याधुनिक युद्धनौका आहे. तसेच ही युद्धनौका अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असून ती वेगवान सुद्धाआहे. नौदलाच्या लांब पल्ल्याच्या मोहिमेसाठी डिझाइन केलेले आहे.

5 मार्च ते 9 मार्चपर्यंत 'कटलास एक्स्प्रेस' या सागरी युद्धाभ्यासाचा कार्यक्रम गल्फ च्या खाडीत आयोजित केला होता.

या युद्धाभ्यासात आयएनएस त्रिकंडने बहरीन, जपान, ओमान, सौदी अरेबिया, यूएई, यूके आणि यूएसए मधील नौदल तुकड्यांशी समन्वय साधून सागरी सुरक्षा वाढवणे, शिपिंग लेन खुल्या ठेवणे आणि नेव्हिगेशनची सुरक्षा सुनिश्चित करणे या उद्देशाने सराव केला.

आंतरराष्ट्रीय सागरी सराव 'कुटलास एक्सप्रेस 2023' (IMX) हा जगातील सर्वात मोठ्या बहुराष्ट्रीय सागरी सरावांपैकी एक आहे. अशा प्रकारच्या सरावात भारतीय नौदलाचे जहाज सहभागी होण्याची ही दुसरी संधी आहे. या युद्धाभ्यासाने नौदलाला प्रादेशिक स्थिरता आणि सुरक्षिततेसाठी अजून मजबूती मिळण्यास मदत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल प्रकरणी विभव कुमार यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT