Kirit Somaiya Neil Somaiya esakal
मुंबई

INS Vikrant Scam : सोमय्या पिता-पुत्राला हायकोर्टाचा दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर

घोटाळ्यात किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांनी INS Vikrantच्या निधीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना मुंबई हायकोर्टानं दिलासा दिला आहे. INS Vikrant घोटाळा प्रकरणी या पितापुत्रांना अटकपूर्व जामीन कोर्टानं बुधवारी मंजूर केला. सोमय्यांविरोधात अद्याप कोणताही पुरावा आढळून आलेला नाही, असं मुंबई पोलिसांनी कोर्टात सांगितलं. (INS Vikrant Scam Mumbai HC Granted anticipatory bail to Kirit and Neil Somaiya)

घोटाळ्यात किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांनी INS Vikrantच्या निधीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. याप्रकरणी राऊत यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. याप्रकरणी अटकेची भीती असल्यानं सोमय्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या माहितीनंतर कोर्टानं नील आणि किरीट सोमय्या यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.

हायकोर्टानं दिला होता अंतरिम दिलासा

यापूर्वी २० एप्रिल रोजी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यासह मुलगा नील सोमय्या यांना मुंबई हायकोर्टानं अटकेपासून अंतरिम दिलासा दिला होता. आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्याप्रकरणी आरोपांसंदर्भात तुर्तास कुठलीही कारवाई न करण्याचे निर्देश कोर्टानं दिले होते.

संजय राऊतांनी केला होता आरोप

आयएनएस विक्रांत निधीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केला होता. किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांतसाठी मुंबईत निधी गोळा केला होता. हा निधी राजभवानाकडे सुपूर्द करणे गरजेचे होते. पण, सोमय्यांनी निधी राजभवनाला दिला नाही. त्याबाबतच पत्र राजभवनाकडून प्राप्त झालं आहे.

आरोपांनंतर दाखल झाला होती तक्रार

संजय राऊतांच्या आरोपानंतर किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी सोमय्या पिता-पुत्रांना अटक होण्याची शक्यता होती. मुंबई पोलिस दोघांचाही शोध घेत होते. मात्र, त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. पहिल्यांदा सत्र न्यायालयाने पिता-पुत्रांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर सोमय्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच किरीट सोमय्यांना अटकेपासून दिलासा दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंजाब किंग्सच्या 'डिल' वर आर अश्विन खूपच प्रभावित; म्हणतोय, हा खेळाडू IPL 2026 मध्ये घुमशान घालणार

Crime News : मोफत पाणीपुरी देण्याची मागणी, नकार देताच चाकूने हल्ला; पाणीपुरी विक्रेत्याचा जागीच मृत्यू

Canada PR Without Job: कधी कॅनडात काम केले नाही? तरीही PR मिळू शकते; जाणून घ्या कसे

Education News: उच्च शिक्षणात क्रांती! परदेशी शिक्षणाचा खर्च वाचणार; भारतातच जागतिक विद्यापीठांचे वर्ग भरणार

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगर येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करणाऱ्यांना वाळू माफियांकडून धमकी

SCROLL FOR NEXT