मुंबई

भयानक! कोविड लसी समजून चोरले पोलिओचे डोस

आरोपीने खिडकीचे गज वाकवले.

सकाळ डिजिटल टीम

कल्याण : सध्याच्या परिस्थितीत कोरोना प्रतिबंधक लसींना (corona vaccine) अत्यंत महत्त्व प्राप्त झालं आहे. नोंदणी करुनही लसीचे डोस वेळेवर मिळत नाहीयत. लसींच्या तुटवड्यामुळे अनेकांना केंद्रावरुन जाऊन विनालस माघारी फिरावे लागतेय. त्यामुळे अनेकजण शक्य त्या मार्गाने लसीचे डोस (vaccine looted) घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. (instead of corona vaccine Accused looted Polio vaccine at Kalyan health center)

कल्याणमध्ये तर काहीजणांची, कोरोना प्रतिबंधक लस चोरण्यापर्यंत मजल गेली आहे. कल्याणच्या मलंगगड भागातील मांगरुळ आरोग्य केंद्रामध्ये लस चोरीचा हा प्रकार घडला. चोरटे करोना प्रतिबंधक लसीचे डोस चोरण्यासाठी म्हणून आरोग्य केंद्रात घुसले. पण त्यांनी कोरोना लसी समजून पोलिओच्या लसींचे डोस चोरुन नेले.

आरोपीने खिडकीचे गज वाकवून आरोग्य केंद्रात प्रवेश केला. तिथून निघताना चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि टीव्ही सुद्धा चोरुन नेला. कल्याण ग्रामीणमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकारामुळे रुग्णालयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT