raigad sakal
मुंबई

आंतरराष्ट्रीय पर्यटन दिन विशेष ; ८० टक्के उत्पन्न निर्बंधांमुळे घटले

व्यवसाय रुळावर आणण्याचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग: समुद्र किनारे आणि धार्मिक, ऐतिहासिक स्थळांमुळे रायगड जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय बहरला आहे. सरकारने या व्यवसायाला मदतीचा हात दिला तर जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर हा व्यवसाय येईल, असा विश्‍वास होता. मात्र, कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून होत्याचे नव्हते झाले. सध्या निर्बंधांमुळे या व्यवसायातील तब्बल ८० टक्के उत्पन्न घटले आहे. आता त्याला रुळावर आणण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागणार आहेत.

रायगड हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. अलिबाग, मुरूड, काशीद, रेवदंडा, नागाव, आक्षी, वरसोली, किहीम, मांडवा, रेवस, श्रीवर्धन, म्हसळा अशा वेगवेगळ्या समुद्रकिनाऱ्यांबरोबरच ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना पर्यटक मोठ्या संख्येने भेटी देतात. मुंबई, पुण्यासह अन्य राज्यातील देश-विदेशातील पर्यटकांची सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी होते. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरन्ट, कॉटेज व्यावसायिकांना रोजगाराचे साधन उपलब्ध होते. तसेच परिसरातील स्थानिकांना यातून रोजगार मिळतो.

या व्यवसायातून वार्षिक १० कोटींपेक्षा अधिक उलाढाल होते; परंतु गेल्या दीड वर्षापासून जिल्ह्यावर कोरोनाचे संकट आले आहे. संकटाचा फटका जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायावर होऊ लागला आहे. सरकारने जाहीर केलेल्या निर्बंधामुळे पर्यटकांची वर्दळ फारच कमी होऊ लागली आहे. ८० टक्क्यांपेक्षा अधिक उत्पन्नावर परिणाम होऊ लागला असून हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत. कर्ज काढून उभा केलेला व्यवसाय आता मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसाय पर्यटकांअभावी ठप्प होण्याच्या मार्गावर आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादलेल्या निर्बंधामुळे पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. हॉटेल, कॉटेज, रेस्टॉरन्टमधील ९० टक्के कामगार कमी करण्याची वेळ आली आहे. हा व्यवसाय कर्ज काढून उभा केला आहे; परंतु कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यटकांची संख्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक घटली. त्यामुळे या व्यवसायावरही परिणाम झाला आहे.

- रुपेश म्हात्रे, कॉटेज व्यावसायिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस! पवई तलाव ओव्हरफ्लो, ७ जलाशयातील पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट समोर

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

Jagannath Puri Rath Yatra 2026: कधी आहे जगन्नाथ पुरी रथयात्रा 2026? जाणून घ्या योग्य तारीख, महत्त्व आणि परंपरा

तेजश्री प्रधानला रिप्लेस करणारी अभिनेत्री होणार आई; समुद्रकिनारी फोटोशूट करत दाखवला बेबी बंप, तुम्ही ओळखलंत का?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

SCROLL FOR NEXT