Video  Sakal
मुंबई

Video : धक्कादायक! आरोपीला वाचवण्यासाठी इराणी नागरिकांची मुंबई पोलिसांवर दगडफेक; घटना CCTV मध्ये कैद

पोलिसांना आरोपी दिसल्यानंतर त्यांनी त्याला पकडण्याची तयारी सुरू केली होती.

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : आंबिवली येथील इराणी वस्तीत मुंबईतील पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. मुंबई येथील डीएन नगर पोलिस एका गुन्ह्यातील फरार आरोपीला ताब्यात घेण्यासाठी आले होते. यावेळी पोलिसांवर दगडफेक देखील झाली. मात्र पोलिसांनी हल्ला परतवून लावत आरोपीच्या मुसक्या आवळून त्याला अटक केली आहे. फिरोज खान असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही थरारक घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

मुंबई विभागातील अंधेरीमध्ये एका व्यक्तीला तोतया पोलिसांनी गंडा घातला होता. ऑगस्ट महिन्यातच ही घटना घडली होती. डीएननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चोरांचा शोध सुरू केला. त्यातील एक आरोपी फिरोज खान हा सराईत गुन्हेगार असून तो कल्याण येथील आंबिवलीतील इराणी वस्तीत राहतो. पोलिसांना त्याला पकडण्यासाठी रविवारी सापळा रचला.

वस्तीत आधी एक महिला आली. ती महिला बुरखा घालून आली होती. ती पोलिस होती. तिच्यासोबत देखील काही पोलीस होते. फिरोज कुठे दिसतोय का हा शोध सुरू होता. अचानक फिरोज एका सलूनमध्ये दाढी करताना दिसून आला. या पोलिसाने वस्ती बाहेर थांबलेल्या पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी कोणत्याही प्रकारची पोलीस जीप न वापरता एक शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी व्हॅन घेऊन आले. आरोपीला पकडले.

या दरम्यान आरोपीच्या लोकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी हा हल्ला परतवून लावत आरोपीला कोणतीही पळून जाण्याची संधी न देता त्याला इराणी वस्तीतून घेऊन गेले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. फिरोज याच्या विरोधात 35 गुन्हे दाखल आहेत.

गेल्या २० वर्षापासून या इराणी वस्तीत चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिस जातात. तेव्हा त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला जातो. एकदा तर पोलिसांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला गेला होता. अशाच एका घटनेत पोलिसांना बचावासाठी गोळीबार करावा लागला. त्यात दोन इराणींचा मृत्यू झाला होता. अखेर इराणी वस्तीतील चोरट्यांची दहशत कधी थांबणार असा प्रश्न केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT