Crime sakal
मुंबई

Mumbai Murder : 'सतत चिडवल्यामुळे आला राग अन्...', अल्पवयीन मुलाने केली ४३ वर्षांच्या व्यक्तीची हत्या

अल्पवयीन मुलाने केली ४३ वर्षांच्या व्यक्तीची हत्या, सतत चिडवत असल्यामुळे वैतागून उचललं पाऊल

सकाळ डिजिटल टीम

मुंबईतील कांदिवली येथे रविवारी सकाळी एका १७ वर्षीय मुलाने 43 वर्षीय व्यक्तीचा स्क्रू ड्रायव्हरने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाल ताब्यात घेण्यात आलं आहे. अल्पवयीन मुलगा अब्दुल रहीम नावाच्या व्यक्तीवर रागावला होता, कारण तो त्या अल्पवयीन मुलाला चिडवत असे.(Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहीम हा ऑटोरिक्षा चालक आहे. त्याच्या ७५ वर्षीय आई आणि दोन मुलांसोबत तो चाळीत राहत होता. तो नियमित दारू प्यायचा. त्याला इतर अनेक व्यसनेही होती. त्याच्या व्यसनांमुळे, चाळीतील रहिवाशांना तो चिडवायचा अनेक कमेंट्स करायचा त्यांचे चाळीतील अनेकांशी वाद झाले होते. रहिमच्या आईनेही त्याला या वागण्याविरुद्ध इशारा दिला होता.(Marathi Tajya Batmya)

पोलिसांनी सांगितले की, रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्याच चाळीत राहणाऱ्या मुलाने रहिमच्या मानेखाली, उजव्या काखेत आणि डोक्याच्या मागील बाजूस स्क्रू ड्रायव्हरने वार केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमी अब्दुल रहीमला रुग्णालयात दाखल केले. रहीमवर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते, मात्र सोमवारी दुपारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.(Latest Marathi News)

रहिमची आई मुमताज मलिक आपल्या मुलाची रुग्णालयात भेट घेतल्यानंतर मुलाविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्या. तेथे, पोलिसांनी अल्पवयीन मुलाला आधीच ताब्यात घेतले असल्याचे त्यांना आढळले.

प्रश्नादरम्यान, अल्पवयीन मुलाने पोलिसांना सांगितले की, रहीमने त्याला चिडवले, त्याच्या चिडवण्याच्या रागातुन त्याने रहीमवर स्क्रू ड्रायव्हरने वार केले. रहिमचा मुलगा देखील पोलिस स्टेशनमध्ये होता आणि त्यानेही अल्पवयीन मुलाच्या या माहीतीवर शिक्कामोर्तब केले आहे.(Marathi Tajya Batmya)

पोलिसांनी सोमवारी रात्री मुलाला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर भादंवि कलम 302 (हत्या) नुसार गुन्हा दाखल केला आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलाला बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले आणि नंतर त्याला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

सकाळी वडिलांकडे मिसळपाव मागितला, खाल्ल्यानंतर ३३ वर्षीय तरुणीनं नवव्या मजल्यावरून मारली उडी

SCROLL FOR NEXT