Sameer Wankhede esakal
मुंबई

Mumbai News : लाचखोरी प्रकरणात आरोपी आयआरएस अधिकारी समीर वानखेडेना अंतरिम दिलासा कायम

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पीडी नाईक आणि एनआर बोरकर यांच्या खंडपीठाने वानखेडे यांच्या सीबीआयने दाखल केलेल्या गुन्हा रद्द

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी कॉर्डेलिया क्रुझ संबंधित खंडणी आणि लाचखोरी प्रकरणात आरोपी आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांना अंतरिम संरक्षण 10 जानेवारीपर्यंत कायम ठेवले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पीडी नाईक आणि एनआर बोरकर यांच्या खंडपीठाने वानखेडे यांच्या सीबीआयने दाखल केलेल्या गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिकेवर सुनावणी करताना दिलासा दिला आहे.

सीबीआयतर्फे वकील कुलदीप पाटील यांनी मंगळवारी न्यायालयात सॉलिसिटर जनरल तुषार मेहता सीबीआयच्या वतीने १० किंवा ११ जानेवारी रोजी युक्तिवाद करण्याची माहिती दिली.

वानखेडे यांचे वकील आबाद पोंडा यांनी १० जानेवारी रोजी युक्तिवाद करणार असल्याचे सांगितले. एनसीबीने दिलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे सीबीआयने मे महिन्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर वानखेडे आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

सीबीआयचे आरोप

सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्यात आयआरएस अधिकारी समीर वानखेडे विरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहे. सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्यात के पी गोसावी हा वानखेडे यांच्यासाठी शाहरुख खानच्या सेक्रेटरीशी डील करत होता.

समीर वानखेडेच्या सांगण्यावरून गोसावीने आर्यन खान प्रकरणात 25 कोटींची मागणी केली होती. या रकमेच्या बदल्यात आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अडकवणार नाही, असे आश्वासन देण्यात आले होते.

समीर वानखेडे यांनी गोसावी यांना सौद्याच्या पैशाच्या प्रकरणात संपूर्ण सूट दिली होती. गोसावी यांनी 18 कोटींचा सौदा पक्का केला होता. एवढेच नाही तर गोसावी यांनी 50 लाख रुपये अॅडव्हान्सही घेतले असल्याचे सीबीआयचे आरोप आहे.

बेहिशेबी मालमत्ता ??

सीबीआयने केलेल्या तपासात समीर वानखेडेने यांनी आपल्या परदेश प्रवासाबाबत योग्य माहिती दिली नव्हती. त्यांनी त्यांच्या महागड्या घड्याळ आणि कपड्यांबद्दल समाधनकारक माहिती दिली नाही. समीर वानखेडे यांच्या बेहिशोबी मालमत्तेचाही सीबीआयने नोंदविलेल्या गुन्ह्यामध्ये उल्लेख आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

Pune News : शहरी गरीब आरोग्य योजनेसाठी मिळकतकराची अट रद्द

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

Naigaon Crime : बापाचा मृतदेह दारातच सोडून नराधम मुलगा पळाला; मात्र, पोलिसांनी मुसक्या आवळल्या

इराणला मोठा धक्का! ३७ हजार कोटी खर्चून मध्य-पूर्वेत सर्वात ऊंच पूल बांधला, अमेरिकेनं उडवला; वीज पुरवठाही खंडित

SCROLL FOR NEXT