Sameer Wankhede esakal
मुंबई

IRS अधिकारी समीर वानखेडेंच्या वडिलांना ऑनलाईन गंडा! सुकामेवा विकत घेणं पडलं महागात

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणं आणि नवाब मलिकांच्या आरोपांमुळं समीर वानखेडे आणि त्यांचे वडील चर्चेत आले होते.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : निवृत्त सरकारी अधिकारी आणि आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांची सायबर फसवणूक झाल्याची घटना उघड झाली आहे. ओशिवरा पोलिसांनी याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सुकामेवा स्वस्तात विकत घेण्याच्या निमित्ताने ज्ञानदेव वानखेडे यांची 30 हजार रुपयांची फसणूक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलीस आणि सायबर पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. (IRS officer Sameer Wankhede father cheated online scam buying dry fruits gets expensive)

स्वस्तात सुकामेवा घेणं पडलं महागात

ज्ञानदेव वानखेडे यांनी सोशल मीडियावर स्वस्त सुकामेव्याबाबतची जाहिरात पाहिली होती. जाहिरातीवर नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील मंगल ड्रायफ्रुट असे लिहिले होते. तसेच त्यावर अजित बोरा नावाच्या व्यक्तीचा मोबाइल नंबर दिला होता.

वानखेडे यांनी त्या क्रमाकावर सोमवारी दूरध्वनी केला असता संबंधित व्यक्तीने स्वस्त दरात सुकामेवा देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार वानखेडे यांनी बदाम, काजू, अंजिर व आक्रोड अशी एकूण 2,000 रुपयांच्या सुका मेव्याची यादी पाठवली. त्यासोबतच 2,000 रूपये वानखेडे यांनी ऑनलाईन सदरच्या खात्यात हस्तांतरित केले.

खात्यातून पैसे लंपास

त्यानंतर सोमवारी सायंकाळी वानखेडे यांना दुसऱ्या एका क्रमांकारवरून दुरध्वनी आला. तुमचे सुकामेव्याचे पार्सल तयार आहे. पण जीएसटीमुळे हा व्यवहार लॉक झाल्यामुळं जीएसटी भरावा लागेल, असे फोनवर सांगितले. त्यावर वानखेडे यांनी काही वेळाने पुन्हा दुरध्वनी करून सुकामेव्याची ऑर्डर कॅन्सल करत पैसे परत करण्यास सांगितले.

त्यावर दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने बँक खात्यात काही तांत्रिक बिघाड असून प्रथम एक रुपया पाठवत असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपीने एक कोड पाठवला. या कोडचा वापर करून व्यवहार केला असता वानखेडे यांच्या खात्यातून 4 ते 5 व्यवहार झाल्याचा संदेश त्यांना प्राप्त झाला.

अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानतंर त्यांनी याप्रकरणी ओशिवरा पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT