Amitabh Bachchan 
मुंबई

अमिताभ यांची 'दीवार' पाडायला BMC करतेय चालढकल?

काय आहे हे प्रकरण ?

दीनानाथ परब

मुंबई: जुहू येथे प्रतीक्षा बंगला म्हणजे सुपरस्टार बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे निवासस्थान. मुंबईतील अन्य ठिकाणांप्रमाणे प्रतीक्षा बंगला (Prateeksha bunglow) सुद्धा प्रसिद्ध आहे. लवकरच या बंगल्याच्या काही भागावर महापालिकेकडून (bmc) हातोडा चालवला जाऊ शकतो. मुंबई महापालिकेने चार वर्षांपूर्वी या संदर्भात अमिताभ बच्चन यांना नोटीसही दिली होती. जुहूच्या (juhu) संत ज्ञानेश्वर मार्गावर अमिताभ यांचा प्रतीक्षा बंगला आहे. रस्ते रुंदीकरणाच्या प्रकल्पासाठी या बंगल्याचा काही भाग पाडायचा आहे. (Is BMC delaying to razed deewar of Amitabh Bachchan Prateeksha bunglow)

मुंबई उपगनरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरकर यांनी शहर सर्वेक्षण अधिकाऱ्यांना रस्ता रुंदीकरणासाठी नेमका किती भाग लागणार आहे? ते चिन्हीत करण्याचे निर्देश द्यावेत, असे महापालिकेने म्हटले आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाटी महापालिकेने रस्ता रुंदीकरण करत आहे. त्यासाठी या भागातील काही बंगल्यांचा भाग महापालिकेने ताब्यात घेतला आहे.

२०१७ मध्ये बच्चन आणि अन्य बंगले मालकांना रस्ते रुंदीकरण प्रकल्पासाठी त्यांच्या भूखंडाचा काही भाग देण्यासाठी पालिकेकडून नोटीस पाठवण्यात आली होती. बहुतांश भूखंड मालकांनी प्रतिसाद दिला. २०१९ मध्ये महापालिकेने प्रतीक्षा बंगल्याला लागून असलेल्या इमारतीची भिंत पाडली. पण अमिताभ यांच्या बंगल्याला हात लावला नव्हता.

या भागातील काँग्रेस नगरसेवक ट्युलिप मिरांडा यांनी के-पश्चिम वॉर्डकडे हा मुद्दा उपस्थित केला. महापालिका जाणीवपूर्वक बच्चन यांची मालमत्ता ताब्यात घ्यायला विलंब लावतेय, असा आरोप त्यांनी केला. "लागून असलेल्या अन्य मालमत्ता ताब्यात घेतल्या फक्त हा भूखंड सोडला आहे. शहर सर्वेक्षण अधिकाऱ्यांकडे हा विषय पाठवून महापालिका वेळकाढूपणा करतय. महापालिकेने हा भूखंड ताब्यात घेतला नाही, तर आम्ही लोकायुक्तांकडे तक्रार करु" असे मिरांडा यांनी म्हटले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. अमिताभ बच्चन यांनी यावर आपली बाजू मांडलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT