मुंबई

बेलापूरच्या इशिताचे नाव सातासमुद्रापार

सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई - स्मार्ट सिटीने देशपातळीवर नावाजलेल्या नवी मुंबई शहराची ओळख आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. ग्रीसमध्ये ‘लिटिल मिस ॲण्ड मिस्टर वर्ल्ड’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बेलापूर गावातील १० वर्षीय इशिता प्रणय दळवी हिने नृत्य आणि सौंदर्य स्पर्धेत कास्यपदक पटकावले. इशितावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

ग्रीसमधील थिस्सलोनिकी येथे २४ ते ३० सप्टेंबरदरम्यान ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत ४७ जणांनी भाग घेतला होता. लहान मुलांच्या गटात इशिताने नृत्य, सौंदर्य, प्रश्‍नमंजुषाचे विविध टप्पे यशस्वीपणे पार करीत कास्यपदक मिळविले. इशिताची भारतीय राष्ट्रीय दिग्दर्शक व्हॅलेंटिना मिश्रा यांच्याकडून निवड घोषित करण्यात आली. इशिता नेरूळच्या डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये शिकत आहे. ती ‘लक्ष्य फाऊंडेशन’मध्ये नृत्य व विविध कलाविष्कारांचे प्रशिक्षण घेत आहे. तिचे प्रशिक्षक नीलेश राजवर्धन यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे तिने हे यश मिळविले आहे.

पालकांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा
इशिता ही लहानपणापासूनच हुशार असल्याने तिला अभ्यासाबरोबर ‘प्रश्‍नमंजुषा’ स्पर्धेच्या अनुषंगाने प्रशिक्षण देण्याचा वडील प्रणय आणि आई प्रीती यांनी निश्‍चय केला. त्यांनी इशिताला कर्ज घेऊन  आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पाठविले. मुलांमध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना देऊन त्यांच्यातील आत्मविश्‍वास वाढविण्यासाठी पालकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन इशिताची आई प्रीती यांनी इतर पालकांना केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याणमधून ठाकरे उमेदवार बदलणार? आणखी एक अर्ज दाखल झाल्यानं चर्चेला उधाण

Latest Marathi News Live Update : दक्षिण मुंबईतून शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

Aranmanai 4 Twitter Review: कुणी म्हणालं, 'ब्लॉकबस्टर' तर कुणी म्हणालं, 'जबरदस्त VFX'; तमन्नाच्या 'अरनमनई 4'नं जिंकली नेटकऱ्यांची मनं

Naach Ga Ghuma Review: 'ती' देखील वर्किंग वूमनच...? हास्य आणि भावनिक क्षणांची रोलर कोस्टर राईड

IND vs PAK T20 World Cup 24 : सामना भारत - पाकिस्तानचा फायदा न्यूयॉर्कच्या हॉटेल्सचा! तब्बल 600 टक्क्यांनी वाढलं रूम्सचं भाडं

SCROLL FOR NEXT