mumbai HC
mumbai HC sakal media
मुंबई

आरोपी इकबाल अहमद कबीर अहमदला सशर्त जामिन मंजूर - हायकोर्ट

सुनिता महामुनकर

मुंबई : इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचा (ISIS terrorist ) हस्तक असल्याचा आरोप असलेल्या परभणी (parbhani) येथील युवक इकबाल अहमद कबीर अहमदला (Iqbal Ahmed Kabir Ahmed) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) आज सशर्त जामीन (granted bail) मंजूर केला.

अहमदला एनआयएने औगस्ट 2016 मध्ये अटक केली होती. मात्र अद्याप चार वर्षे उलटून झाली तरी खटला सुरू झाला नाही आणि अभियोग पक्षाने सुमारे दिडशे साक्षीदारांची यादी दिली आहे. त्यामुळे जामीन मंजूर करावा, अशी मागणी त्याने केली होती. राज्य सरकारने या जामिनाला विरोध केला होता. न्या एस एस शिंदे आणि न्या एन जे जमादार यांच्या खंडपीठाने आज यावर निकाल जाहीर केला. अहमदला न्यायालयाने एक लाख रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. तसेच पारपत्र एन आय एकडे जमा करावे, एनआयए न्यायालय क्षेत्राबाहेर जाऊ नये, तपासात सहकार्य करावे, चौकशीला हजर रहावे असे आदेश दिले आहेत.

खटले प्रलंबित असल्यामुळे आरोपींना कारागृहात खितपत रहावे लागते, त्याची कारणे काही असली तरी त्यामुळे आरोपी कारागृहात वर्षोनुवर्षे राहतात, असे मत या सुनावणीमध्ये यापूर्वी न्यायालयाने व्यक्त केली होती. औरंगाबाद येथील एटीएस युनिटवर हल्ला करण्याचा कट परभणी मौडेल या नावाने करण्यात आला होता. यामध्ये एटीएसने आणखी दोघांना अटक केली आहे. एटीएसकडून हा तपास एनआयएकडे वर्ग झाला आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cut Outs Removed: शिवाजी पार्क परिसरातील मोदी-शहांचे कटआऊट्स हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई

CSEET Result : ICSI कडून CSEET 2024 चा निकाल जाहीर; 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करुन स्कोअरकार्ड डाऊनलोड करा

Share Market Closing: निफ्टी 22400 पार.. चढ-उतारानंतर शेअर मार्केट वाढीसह बंद, जाणून घ्या कशी आहे शेअर्सची स्थिती!

पिता-पुत्रामध्ये होणार होती लढत; पण आता स्वामी प्रसाद मौर्य उमेदवारी अर्ज घेणार मागे? कारण आलं समोर

Latest Marathi News Live Update : आरटीई प्रवेशासाठी उद्यापासून अर्ज भरता येणार

SCROLL FOR NEXT