Jitendra Awhad and Narendra Modi 
मुंबई

Jitendra Awhad : मुंबईला कमकुवत करण्याचं केंद्र सरकारच धोरण; आव्हाड यांची जोरदार टीका

रवींद्र देशमुख

मुंबई - विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी देशभरातील अनेक नेते मुंबईत दाखल झाले आहेत. या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. या बैठकीपूर्वी राज्यातील महाविकास आघाडीची पत्रकार परिषदही आज पार पडली. या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर मुंबईच्या मुद्दावर जोरदार टीका केली.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मुंबईला कमकुवत करणं हेच केंद्र सरकारचं धोरण आहे. दिल्लीश्वरांना मराठी माणसाला कायम वाकवायच असत. मात्र मराठी माणूस वाकत नाही हे त्यांचं दुःख आहे. याआधी उद्धव ठाकरे यांनी देखील केंद्र सरकारला मुंबईचं महत्त्व कमी करायचं असल्याचं आरोप केला होता.

आव्हाड पुढं म्हणाले की, मणिपूरचं प्रकरण डोळ्यासमोर असताना देशात महिला सुरक्षित नसल्याचं समोर आलं. हे भारताच्या संस्कृतीला अशोभनीय आहे. महिलांना सुरक्षिततेची भावना निर्माण व्हायला हवी. निवडणुका जवळ आल्या की गॅसचा भाव कमी झाला. अती झालं की लोकांच्या लक्षात येत, असंही आव्हाड यांनी गॅस सिलिंडर दरकपातीवर म्हटलं.

दरम्यान माझा अजुनही इव्हीएम मशिनवर विश्वास नाही. तो लोकशाहीला सर्वात मोठा धोका आहे. येणाऱ्या चार राज्यातील निवडणुकी काँग्रेस जिंकणार आहे. या चार राज्यात भाजप इव्हीएम मॅनेज करणार नाही. मग केंद्रात विजय मिळवणार, असंही आव्हाड यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT