मुंबई

मुंबईत आजही पावसाचं धुमशान, हवामान खात्यानं दिला इशारा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत पावसानं धुमशान घातलं आहे. अशातच सोमवारीही मुंबई शहर व उपनगरांतील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाकडून सोमवारीही (6 जुलै) मुंबई आणि कोकणात पावसाचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर शहरातील काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशाराही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. 

गेल्या काही दिवसांमध्ये तर मुंबईत झालेल्या पावसामुळे अनेक भागात पाणीही साचलं होतं. त्यामुळे ट्राफिकची समस्याही निर्माण झाली होती. महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीच्या भागात वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किमी इतका असणार आहे. कुलाबा येथील प्रादेशिक हवामान खात्याकडून या काळात मच्छिमारांना खोल समुद्रात न जाण्याचे आवाहन केलंय. तसंच, आवश्यक असल्यासच घराबाहेर पडा असा इशाराही हवामान खात्यानं दिला आहे. येत्या चोवीस तासात शहरातील कमाल तापमान 27 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 24 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

तसंच नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. शक्य असेल तर घराबाहेर पडू नका, अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडा असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.

राज्यात पुढचे चार दिवस मुसळधार पाऊस

कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यानुसार काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे . तर मुंबईसह उपनगरात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घाट माथ्यावर धबधब्यांचा पाण्याचा प्रवाह वाढण्याचा आणि दरडी कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई, ठाण्यासह उपनगरात शनिवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसानं अक्षरश: धुमशान घातलं. रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं. शनिवार सुरु झालेला पाऊस रविवारीही कायम राहिला. शनिवारी मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, कोल्हापुरात पावसानं जोर धरल्यानं नदी-नाल्यांना पूर आला होता. ठाणे-दिवा-डोंबिवली-कल्याण-भिवंडी परिसरात रात्रभर पाऊस सुरू होता. त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT