मुंबई

राज्यपाल नियुक्त आमदारांची नावे घोषित करण्याआधीच त्यांना विरोध करणे चुकीचे

सुनिता महामुनकर


मुंबई : राज्यपाल नियुक्त आमदारांविरोधात करण्यात आलेली याचिका अकाली असून अद्याप राज्यपालांनी नावेच घोषित केलेली नाही, असा दावा राज्य सरकारच्या वतीने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला.

विधान परिषदेवर नियुक्त केले जाणाऱ्या बारा आमदारांची यादी महाविकास आघाडीने राज्यपालांना दिली आहे. मात्र अद्यापही राज्यपालांनी त्याला मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे त्याआधीच त्याला विरोध करणे योग्य नाही, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले.

उर्मिला मातोंडकर, आनंद शिंदे, नितीन पाटील व अनिरुद्ध वनकर हे चार उमेदवार कला क्षेत्राशी निगडित आहेत. तर एकनाथ खडसे, राजू शेट्टी, सचिन सावंत यांच्यासह आठजण राजकीय क्षेत्रातील आहेत. कायद्यानुसार राज्यघटनेच्या अनुच्छेद १७१(५) अन्वये कला, साहित्य, सामाजिक कार्य, विज्ञान व सहकार चळवळ या क्षेत्रातील प्रस्तावित सदस्य असणे बंधनकारक आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

It is wrong to oppose the governor appointed MLAs before announcing their names

-------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले..."

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

SCROLL FOR NEXT