Pankaja Munde_Dhannjay Munde 
मुंबई

"पंकजा मुंडेंनी मविआचा चष्मा लावल्यास बरं होईल"; धनंजय मुंडे असं का म्हणाले?

एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर असताना पंकजा आणि धनंजय मुंडे या बहिण-भावानं एकमेकांना कोपरखळ्या मारल्या.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडीचा चष्मा लावल्यास बरं होईल, असं विधान राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच पंकजा मुंडे यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी केलं आहे. एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर असताना पंकजा मुंडेंनी मारलेल्या कोपरखळीवर धनंजय मुंडे यांनी हे विधान केलं. पण याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली.

डॉ. तात्याराव लहाने यांच्या रघुनात रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह दिग्गज राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे या बहिणभावानंही उपस्थिती लावली.

"ज्यांच्या अनुभवाच्या आणि ज्यांच्या राजकीय दृष्टीच्या लेन्सेस कुणाकडंही नाहीत असे शरद पवार. तसेच सगळ्यांनी मवाळ आणि प्रेमानं वागणारे बाळासाहेब थोरात. नवी दृष्टी देण्याची अपेक्षा असलेले आदित्य ठाकरे तसेच ज्यांच्या सोफेस्टिकेटेड लेन्स आहेत असे अमित देशमुख तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे बंधु धनंजय मुंडे ज्यांना मुंडे-महाजन यांच्या लेन्सेसमधून स्वतःला मोठं करत आज शरद पवारांच्या लेन्सेसमधून बघण्याचं भाग्य लाभलं जे खूप कमी लोकांना लाभतं," अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना कोपरखळी मारली.

पंकजा मुंडेंच्या या कोपरखळीवर धनंजय मुंडे म्हणाले, "कधीतरी अशा लेन्सेसच्या फोकसमध्ये आपल्याला यावं लागतं. आम्ही आणि आदित्य ठाकरे बोलत होतो तेव्हा ते म्हणाले की, कदाचित ताईंनी आपल्या लेन्सेस बदलल्या आणि महाविकास आघाडीच्या लावल्या तर बरं होईल, असं ते म्हणतं होतं मी नाही. हा मजेचा भाग सोडून द्या पण आम्ही बीड जिल्ह्यात आलो की आमच्या बहिण-भावाचं राजकीय वैर काय कसं आहे, हे सर्व जगाला माहिती आहे. पण काही कुटुंब आणि काही व्यक्ती यांचं मोठेपण एवढं आहे की त्यांच्यासाठी आमचं वैर काही नाही. आमच्यासाठी तुम्ही मोठे आहात त्यामुळं आम्ही आज इथे आहोत"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

इराणला मोठा धक्का! ३७ हजार कोटी खर्चून मध्य-पूर्वेत सर्वात ऊंच पूल बांधला, अमेरिकेनं उडवला; वीज पुरवठाही खंडित

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT