natya
natya 
मुंबई

...म्हणून विजय तेंडुलकर, डॉ. श्रीराम लागू नाट्य संमेलनाध्यक्षपदाला मुकले 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवड सन्मानाने व्हायला हवी; परंतु निवडणूक होत असल्याने विजय तेंडुलकर, डॉ. श्रीराम लागू, सतीश आळेकर, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर यांच्यासारख्या ज्येष्ठ रंगकर्मींना संमेलनाध्यक्ष होता आले नाही, अशी खंत 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केली. ज्ञानपीठ पुरस्काराच्या धर्तीवर नाट्य संमेलनाध्यक्षपद सन्मानानेच दिले जावे, अशी विनंती त्यांनी नाट्य परिषद व नियामक मंडळाला केली. 

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांचा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने सत्कार केला. त्यावेळी डॉ. पटेल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नाट्य संमेलनाध्यक्ष झाल्याचा आनंद आहे. या आनंदाच्या क्षणी डॉ. श्रीराम लागू, विजय तेंडुलकर, पु. ल. देशपांडे, निळू फुले यांची खूप आठवण येते, असे ते म्हणाले. सध्या देशाचे नागरिक आहात का, असे विचारून लोकांकडून प्रमाणपत्रे घेतली जातात. त्याचप्रमाणे संमेलनाध्यक्षपदासाठी अर्ज करताना तुम्ही किती नाटके केली, कोणत्या नाटकांचे दिग्दर्शन केले, असे लिहून घेतले जाते. रंगकर्मीचे संपूर्ण आयुष्य घडताना सर्वांना दिसले; मग अर्जाची आवश्‍यकता काय, असा सवाल त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत उपस्थित केला. 

शतकमहोत्सवी मराठी नाट्यसंमेलनाच्या पार्श्‍वभूमीवर जागतिक रंगभूमीत मराठी रंगभूमीचे स्थान काय, याचा विचार झाला पाहिजे. मराठी नाटकाने आत्मकेंद्री राहण्यातून बाहेर पडून प्रादेशिक नाटके आणि जागतिक रंगभूमीचा अभ्यास करायला हवा, असा सल्ला डॉ. पटेल यांनी दिला. प्रादेशिक नाटके आणि प्रायोगिक नाटके यांची सरमिसळ होणे आवश्‍यक आहे, असे ते म्हणाले. आपली मराठी नाटके अमराठी लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आजच्या आधुनिक काळात सबटायटल आणि तंत्रज्ञानाचा वापर करता येईल, अशी सूचना त्यांनी केली. 

--------------

अभ्यास, उपक्रमशीलता हवी 
100 तरुणांनी वेगळा विचार करून वेगळा आविष्कार केल्यास संमेलनाला अकादमीचे स्वरूप प्राप्त होईल. नाट्य संमेलन दिमाखात होते; अभ्यासपूर्णता आणल्यास आणखी झळाळी येईल, असा विश्‍वास डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केला. संहिता, संवाद, पाश्‍चिमात्य दिग्दर्शकांच्या नाटकांचे व्हिडीओ, त्यांच्या कार्यशाळा आणि भारतीय नाटकांचा महोत्सव असे उपक्रम राबवणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकारने नाट्य परिषदेला आर्थिक साह्य द्यावे, असेही डॉ. पटेल म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

"मी माझ्या मुली घेऊन चालले..."; व्हिडिओ पोस्ट करत विवाहितेने जीवन संपवलं, दोन मुलींना दिलं विष

ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; सॅम पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

Latest Marathi News Live Update : मतदान कमी झाल्याची चिंता नाही - अजित पवार

SCROLL FOR NEXT