Mumbai-Jaipur Exp Firing Esakal
मुंबई

Jaipur-Mumbai Exp Firing : "जे व्हायचे ते झाले, आता तू..." गोळीबारानंतर चेतनने पत्नीला केला पहिला फोन

जयपूर-मुंबई एक्सप्रेसमधील गोळीबार प्रकरणाची लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दल आणि एटीएस कडून स्वतंत्र चौकशी सुरु

सकाळ वृत्तसेवा

नितीन बिनेकर,सकाळ वृत्तसेवा

Jaipur-Mumbai Exp Firing - जयपूर- मुंबई एक्सप्रेसमध्ये गोळीबार करून चौघांना ठार केल्यानंतर आरोपी चेतन सिंहने त्याची रेणू सिंह यांना कॉल केला.' जे व्हायचे ते झाले, आता तू मुलांची काळजी घे.

त्यांचा नीट सांभाळ कर. असं सांगितले. या संभाषनानंतर दहिसर ते मीरा रोड दरम्यान ट्रेन थांबल्यावर चेतन ट्रेनमधून खाली उतरून मीरा रोड स्थानकाच्या दिशेने निघाला होता. पोलीस तपासात हि बाब समोर आली आहे.

पत्नी,आईची चौकशी

जयपूर-मुंबई एक्सप्रेसमधील गोळीबार प्रकरणाची लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दल आणि एटीएस कडून स्वतंत्र चौकशी सुरु आहे.चेतन सिह यांच्या पत्नी आणि आई शनिवारी (ता.5)ला मुंबईत आल्या आहेत. दोघांचाही जबाब पोलिसांनी बोरिवली येथे नोंदवला.

दोघांचीही चौकशी करण्यात आली. आरोपी चेतन सिंह याचा स्वभाव, आजार आणि तो काय वाचत होता यासंदर्भातील विविध प्रश्न त्यांना पोलिसांनी विचारल्याचे समजते.

रेणू सिंह हिने चेतनच्या मानसिक आजारासंदर्भात माहिती आणि संबंधित कागदपत्रेही तपास अधिकाऱ्याकडे सुपूर्द केल्याची माहिती आहे.

सिन रिक्रियेट

पोलीस तपासता वारंवार चेतन सिह आपल्या मुलांना आणि कुटूंबियांची आठवण करीत आहे. तसेच पत्नीशी भेटू देण्याची विनंतीही त्याने अनेकदा पोलिसांकडे केली.

पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा सिन रिक्रिएट केला आहे. या मुंबई सेंट्रल यार्डमध्ये सीलबंद बी -४ ते एस -६ डब्यांची तपासणी करून ते दृश्य पुन्हा तयार केले.

यावेळी रेल्वे पोलिसांसोबत आरपीएफ कॉन्स्टेबल अमय आचार्यही उपस्थित होते. गोळीबाराची घटना घडली त्यादिवशी अमय आचार्य ट्रेन एस्कॉर्टिंग टीममध्ये सामील होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT