मुंबई

Jaipur-Mumbai Exp Firing: प्रवाशांसोबत वाद नव्हता, 'या' कारणामुळं कॉन्स्टेबलनं झाडल्या गोळ्या; रेल्वे पोलीस आयुक्तांची माहिती

जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये आज सकाळी गोळीबाराची घटना घडली, यामध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये आज सकाळी गोळीबाराची घटना घडली, यामध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे. हा गोळीबार एका आरपीएफच्या कॉन्स्टेबलनं केला आहे. त्याचं हे टोकाचं पाऊल उचलण्यामागं प्रवाशांसोबत वाद झाल्याचं सांगितलं जात होतं.

पण हे कारण नव्हतं तर दुसरं कारण असल्याचं आता पश्चिम रेल्वेच्या पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे. (Jaipur Mumbai Express Firing no dispute with passengers constable is short temper Railway Police Commissioner)

आरपीएफ कॉन्स्टेबलची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळं त्यानं स्वतःवरील नियंत्रण गमावलं आणि त्याच्या वाटेत जो कोणी येईल त्याच्यावर त्यानं गोळ्या झाडल्या. यामध्ये पहिल्यांदा त्यानं सहाय्यक उपनिरिक्षक टिकाराम यांच्यावर गोळी झाडली. त्यानंतर प्रवाशांवर गोळ्या झाडल्या. प्रवाशांसोबत त्याचा कुठलाही वाद झालेला नव्हता, अशी माहिती माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तर देताना रेल्वे पोलीस आयुक्तांनी दिली. (Latest Marathi News)

जयपूर-मुंबई एक्प्रेसमध्ये सकाळी साडे पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. चेतन सिंह असं आरोपी कॉन्स्टेबलचं नाव असून त्यानं त्यानं आपल्या वरिष्ठासह तीन प्रवाशांवर गोळ्या झाडल्या, यामध्ये या चौघांचा मृत्यू झाला. त्यानंतर ट्रेनची चेन पुलिंग करत त्यानं दहिसर जवळ पळून जाण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर मोठा प्रकल्प; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडसाठी ३,७२२ कोटींच्या भूसंपादनाला मंजुरी

पतीसोबत वादात मदतीच्या बहाण्याने भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाचा २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार; भिवंडीत दोघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : गोकुळमधील अदृष्य शक्तीला पुन्हा दणका, ४९२ दूध संस्थांना मतदानाचा अधिकार कायम

Pune Beed Train: पुणे-बीड प्रवास आता सात तासांत; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज रेल्वेसेवेचा प्रारंभ; असे आहे वेळापत्रक

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे; मुंबई दौरा तूर्तास स्थगित, सरकारला ३ महिन्यांचा थेट अल्टिमेटम; ​मंत्री विखे पाटील, दादा भुसे अन् सुरेश धसांच्या मध्यस्थीला यश

SCROLL FOR NEXT