Crime News Esakal
मुंबई

Mumbai-Jaipur Exp Firing: जयपुर मुंबई एक्स्प्रेसमध्ये गोळीबार; घटनेत एका पोलीसासह ४ जणांचा मृत्यू

मीरा रोड स्थानकाजवळ झाला गोळीबार

अंकिता खाणे (Ankita Khane)

दहिसर ते मीरा रोडदरम्यान एक्स्प्रेसमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहीती आहे. तर या घटनेत एका आरपीएफच्या जवानाचा देखील मृत्यू झाला आहे. जयपुर मुंबई एक्स्प्रेसमध्ये हा गोळीबार झाला आहे.

आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पालघर रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडल्याची माहीती आहे. या घटनेत एका आरपीएफच्या जवानासह ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबार झाल्यानंतर एक्स्प्रेस मीरा-रोड दहिसर येथे थांबवण्यात आली आहे.

ही ट्रेन गुजरातमधून महाराष्ट्रातील पालघरमध्ये दाखल होताच या ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याची माहिती आहे. या गोळीबारात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर काही प्रवासी जखमी झाल्याचीही प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळतात जीआरपी पोलीस आणि आरपीएफ पोलीस घटनास्थळावर दाखल झाले आहेत. ते घटनेचा अधिक तपास करत आहेत. सध्या ही मुंबई सेंट्रल येथे थांबवण्यात आली आहे.

गाडी नंबर 12956 मध्ये साडेपाच वाजण्याच्या सुमाराला गोळीबाराची घटना घडली.या गाडीतील कोच B 5 मध्ये गोळीबाराची घटना घडली असून आरपीफ जवानाचा आपसात वाद झाल्यामुळे ही घटना घडली असून कॉन्स्टेबल चेतन कुमार याने हा गोळीबार केला असल्याची माहिती समोर आली आहे..

एक्स्प्रेसमधून मृतदेह बाहेर काढून शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. आता पुढील प्रकिया सुरू करण्यात आली आहे. मुंबई सेंट्रल पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात येत आहे. मृतांची ओळख पटवण्याचेही काम सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

Agriculture Day Celebration: घोडेगावात कृषी दिन उत्साहात साजरा; आधुनिक तंत्रज्ञान, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा सन्मान

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

SCROLL FOR NEXT