Jaipur Mumbai Train Firing 
मुंबई

Jaipur Mumbai Train Firing: RPF कॉन्स्टेबलने गोळ्या झाडलेले 3 प्रवासी कोण होते? संपूर्ण माहिती समोर

Sandip Kapde

Jaipur Mumbai Train Firing: पालघरमध्ये जयपूर-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनमध्ये एका RPF कॉन्स्टेबलने त्याच्या वरिष्ठ ASI वर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत गोळी लागल्याने एएसआय आणि अन्य ३ प्रवाशांचा मृत्यू झाला. चेतन सिंग नावाच्या हवालदाराने हा गोळीबार केला. याला पोलिसांनी मीरा रोड येथून अटक केली आहे.

आरपीएफ जवानाने अचानक गोळीबार का केला, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दरम्यान मृत्यू झालेले तीन प्रवासी कोण होते ही माहिती समोर आली आहे.

सय्यद सैफुल्लाह, अब्दुल कादिर मोहम्मद आणि असगर शेख, अशी मृत झालेल्या प्रवाश्यांची नावे आहेत. यामधील असगर हा कामाच्या शोधात मुंबईला येत होता. तर सय्यद सैफुल्लाह मुंबईमार्गे हैदराबादला जात होता. तर अब्दुल कादिरचा या महिन्यात दुबईला जाण्याच्या विचारात होता, इंडीया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे. (Jaipur Mumbai Train Firing)

सय्यद सैफुल्लाह -

सय्यद सैफुल्लाह त्यांच्या पश्चात तीन मुली असून सर्वात धाकटी सहा महिन्यांची आहे. हैदराबादमधील नामपल्ली भागातील एका मोबाईल शॉपमध्ये तो काम करत होता.मोबाईल शॉपीच्या मालकासह अजमेर शरीफ दर्ग्याला भेट देऊन ते अजमेरहून परतत होते.

असगर शेख-

असगर शेख हा सोमवारी रेल्वेने मुंबईला जात होता. कामाच्या शोधात तो पहिल्यांदाच मुंबईला येत होता. असगर तीन वर्षांपूर्वी जयपूरला गेला होता. तिथे तो बांगड्या बनवण्याचे काम करत होता. मात्र मिळणाऱ्या मोबदल्याच पोट भरत नसल्यामुळे तो मुंबईत कामाच्या शोधात येत होता. मात्र चेतन सिंग याने केलेल्या गोळीबारात त्याचा अंत झाला आहे.  (latest marathi news)

अब्दुल कादिर मोहम्मद -

अब्दुल कादिर मोहम्मद याचा देखील मृत्यू झाला आहे. अब्दुल कादिर मोहम्मद हा महाराष्ट्रातील नाला सोपारा येथे २४ वर्षापासून आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याच्या पाश्चात पत्नी, दोन मुले, सून, नातवंडे असा परिवाकर आहे. हे सर्व दुबईला जात होते. मात्र कागदपत्रांच्या समस्येमुळे ते जाऊ शकले नाही. अब्दुल हा एक व्यापारी आहे. मोहरमसाठी तो त्याच्या मूळ गावी भानुपूरला जात होता.

RPF कॉन्स्टेबल चेतन सिंगने त्याच्या एस्कॉर्ट ड्युटीचे प्रभारी एएसआय टिका राम मीना यांची गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर दुसऱ्या कोचमध्ये जाऊन तीन प्रवाशांची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर, मीरा रोड स्थानकाजवळ थांबलेल्या ट्रेनची साखळी प्रवाशांनी खेचल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात आरोपी कॉन्स्टेबल चेतन सिंग याला त्याच्या शस्त्रासह पकडण्यात आले. या घटनेबाबत आत्तापर्यंत 15 हून अधिक लोकांचे जबाब घेण्यात आले असून त्यात पोलीस अधिकारी आणि ट्रेनमधील प्रवाशांच्या जबाबांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diwali 2025 Picks: दिवाळीत खरेदी करा हे 10 शेअर्स; तुम्हाला मिळेल 25 टक्क्यापर्यंत परतावा, पाहा यादी

'तो माझा श्रावणबाळ...' आईला कॅन्सरचं निदान झालं अन्... पुरस्कार मिळाल्यानंतर पारु मालिकेतील आदित्यला अश्रू अनावर!

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! गोव्यात प्रवेश करताना 'ही' कागदपत्रे सोबत ठेवा, अन्यथा भरावा लागेल दंड; वाहनांची होणार तपासणी

Abrar Ahmed Video : भारताच्या 'गब्बर' ला बुक्क्याने मारायची इच्छा! मुंडी हलवणाऱ्या पाकिस्तानानी खेळाडूचं धाडस ऐका...

Education News : शिक्षणाधिकारीच अडकले! विस्तार अधिकाऱ्यांच्या पत्नीकडून बदलीसाठी 'अवघड क्षेत्रा'ची खोटी माहिती; दिंडोरीत खळबळ

SCROLL FOR NEXT