anil.jpg 
मुंबई

राज्याचे गृहमंत्री बदलणार? जयंत पाटील यांचं महत्त्वाचं विधान

दीनानाथ परब

मुंबईत वाय.बी.सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बैठकीसाठी येथे पोहोचले आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, जयंत पाटील बैठकीसाठी येथे दाखल झाले आहेत. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएकडून झालेल्या अटकेच्या मुद्दावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. 

आतापर्यंत विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने सचिन वाझे प्रकरणावरुन शिवसेनेला पद्धतशीरपणे लक्ष्य केले. शिवसेनेची विश्वासहर्ता कमी करुन प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आज अचानक माध्यमांनी राष्ट्रवादी काँग्रेस अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदावरुन दूर करणार असल्याच्या बातम्या चालवल्या.. 

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेली स्फोटकांनी भरलेली कार, त्यानंतर मनसुख हिरेन यांचा झालेला मृत्यू आणि सचिन वाझेंना झालेली अटक यामध्ये पोलीस खात्याचं नाव खराब झालं. राज्याचं गृहखातं राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. राज्याच्या गृहखात्याचं हे अपयश असल्याची टीका विरोधकांकडून सुरु आहे. 

दरम्यान अनिल देशमुखांकडून गृहखात काढून घेणार असल्याची चर्चा होती. पण आघाडी सरकारमधील मंत्री जयंत पाटील यांनी असा कोणताही निर्णय होणार नसल्याचं स्पष्ट केलं. सरकार कोणालाही पाठिशी घालत नाही. कोणतेही अंदाज बाधण्याची शक्यता नाही. खातेबदल होण्याची कोणतीही शक्यता नाही, असे  जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: पावसाने उघड केलं विकासाचं वास्तव! मुंबईत झाडं कोसळली, रस्ते वाहून गेले, मिसिंग लिंकवर खड्ड्यांचं साम्राज्य

Pune Flyover Work Stalled: कोरेगाव मूळ रेल्वे गेट क्र. ८ वरील बहुप्रतिक्षित उड्डाणपूलाचे काम भूसंपादन मोबदला न मिळाल्याने पुन्हा ठप्प

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

Education Crisis: अर्धापूरात ८४ शिक्षक बीएलओ कामात अडकले; दोन-दोन वर्गांवर एकच शिक्षक, विद्यार्थ्यांच्या शिक्षणहक्कावर गदा

रविवार ठरणार खास! आयुष्मान योगामुळे 2 राशींची लागणार लॉटरी; जाणून घ्या तुमचं भविष्य

SCROLL FOR NEXT