मुंबई

कोविड-19 च्या काळात शासकीय बदल्यांना मुदतवाढ द्यावी -  शेकापचे जयंत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

प्रशांत कांबळे : सकाळ वृत्तसेवा

मुंबई  ः कोविड 19 या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 2020-21 या आर्थिक वर्षातील बदल्यासंदर्भात राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय काढला आहे. त्यानूसार 31 मे पर्यंतच्या सर्वसाधारण करावयाच्या बदल्या आता, 31 जुलै पर्यंत संबंधीत संवर्गातील एकूण कार्यरत पदाच्या 15 टक्के करायच्या आहे. मात्र, या बदल्या केल्यास कोरोना लढाईमध्ये सातत्य राहणार नाही. त्यामूळे या बदल्यांना एक वर्षांची मुदतवाढ देण्याची मागणी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

 तोडफोड करणारा 'तो' आरोपी CCTV त कैद, पोलिसांकडून तपास सुरु 
 
राज्यात कोरोना संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असून, कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यातील सर्व विभागांतील अधिकारी, कर्मचारी वर्ग उत्तमरीत्या काम करीत आहेत. मात्र, कोविड 19 या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर 2020-21 या आर्थिक वर्षातील बदल्या करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, त्यासंदर्भात 7 जुलै रोजी यासंदर्भातील आदेश सुद्धा काढण्यात आला आहे. मात्र, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्यास कोरोना महामारीच्या अनुषंगाने केलेल्या विविध विभागांतर्गत च्या उपाययोजना मध्ये सातत्या विस्कळीत होण्याची शक्यता आहे. 

कोरोना काळात अधिकारी, कर्मचारी संवर्गातील बदली केल्याने प्रशासनावर ताण निर्माण होण्याची शक्यता आहे.तसेच ज्या जिल्हा, तालुक्याच्या ठिकाणी अधिकारी, कर्मचारी वर्ग काम करीत आहेत तेथिल परिस्थिती ची त्यांना जाण असून नवीन अधिकारी त्या ठिकाणी आल्यानंतर तेथील परिस्थिती जाणून घेण्यासाठी व त्यावर उपाय योजना करण्यासाठी विलंब होऊ शकतो. त्यामूळे चालू वित्तिय वर्षात कोणत्याही संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या न करता एक वर्षासाठी त्यांना मुदतवाढ देण्याची मागणी शेकापचे आमदार  जयंत पाटील यांनी केली आहे.

------

(संपादन - तुषार सोनवणे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kokilaben Ambani Hospitalised : कोकिळाबेन अंबानी यांची अचानक तब्येत बिघडली, एच एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल

Maharashtra Latest News Live Update : गोदावरी नदीची पाणी पातळी पूर्वपदावर

Solapur Bailpola:'अकोलेकाटीत वीस वर्षांपूर्वी प्रत्येकाच्या दारात होती बैलजोडी'; आज बोटावर मोजण्याइतक्याच; ट्रॅक्टरने बळकावली बैलांची जागा

South America Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने दक्षिण अमेरिका हादरली ! 8.0 इतकी तीव्रता, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Nations Cup 2025: नेशन्स करंडक स्पर्धेसाठी भारतीय फुटबॉल संघाचे शिबिर सुरू; सहा दिवसांनंतरही ३५ पैकी २५ खेळाडूंचीच उपस्थिती

SCROLL FOR NEXT