ED Arrested Naresh Goyal
ED Arrested Naresh Goyal Sakal
मुंबई

Jet Airways Scam : जेट एअरवेज घोटाळा प्रकरणी नरेश गोयल याना 11 सप्टेंबरपर्यंत ईडी कोठडी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - कॅनरा बँकेतील 538 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने 11 सप्टेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. नरेश गोयल यांना ईडीकडून प्रदीर्घ चौकशीनंतर शुक्रवारी अटक करण्यात आली.

सीबीआयने नरेश गोयल, त्यांची पत्नी आणि इतरांविरुद्ध 538 कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणूक प्रकरणात गुन्हा नोंदवला. या प्रकरणात, ईडीने जेट गोयल आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनेक शहरांमध्ये छापे टाकले होते.त्यांनतर ईडीने अटक केली होती.

कॅनरा बँकेचे कर्जवसुली व कायदेशीर विभागाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक पी. संतोष यांनी 23 नोव्हेंबर 2022 रोजी सीबीआयकडे तक्रार केली होती. त्यात नरेश गोयल यांच्या विरोधात फसवणूक, गुन्हेगारी कट रचणे, फौजदारी विश्वासघात, गुन्हेगारी नियमभंग केल्याचा आरोप करण्यात आला होता.

कॅनरा बँकेच्या कफ परेड येथील कॉर्पोरेट कार्यालयाद्वारे कर्ज सुविधा जेट एअरवेजला देण्यात आली होती. जेट एअरवेजचे खाते बँकेने 5 जून 2019 मध्ये बुडीत घोषित केले होते. त्यानुसार 538 कोटी 62 लाख रुपये बँकेला येणे बाकी असल्याने तेवढय़ा रकमेचे बँकेचे नुकसान झाले होते. कॅनरा बँकेच्या कफ परेड येथील कॉर्पोरेट कार्यालयाद्वारे कर्ज सुविधा पुरवली होती.

याबाबत बँकेकडून पडताळणी करण्यात आली असता बँकेकडून देण्यात आलेला निधी इतर ठिकाणी वळवण्यात आल्याचे उघड झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अज्ञात सरकारी अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी आरोपींना मदत केल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Rohit Sharma: रोहितने प्रायव्हसीचा भंग करण्याच्या आरोपावर स्टार स्पोर्ट्सनं दिलं स्पष्टीकरण

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT