chain snaching  sakal
मुंबई

Navi Mumbai Crime: मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र खेचले

सकाळ वृत्तसेवा

Crime News: गोठीवली येथील तलावाजवळ मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका महिलेच्या गळ्यातील 50 हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र अज्ञात लुटारुने खेचुन पलायन केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.

रबाळे पोलिसांनी या घटनेतील लुटारु विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे. या घटनेतील तक्रारदार महिला वंदना साबळे (47) या रबाळे येथील नोसील नाका येथे कुटुंबासह राहण्यास आहेत. वंदना साबळे या दरदिवशी सकाळी 6 वाजता मॉर्निंग वॉकसाठी गोठीवली येथील खदान तलावाजवळ जातात.

गुरुवारी 1 फेब्रुवारी रोजी सकाळी देखील त्या मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. यावेळी वॉकींग आणि व्यायाम झाल्यानंतर त्या तेथील कट्टयावर बसल्या होत्या. याचवेळी त्यांच्या पाठीमागील झाडीतून आलेल्या एका लुटारुंने वंदना साबळे यांच्या गळ्यातील 12.5 ग्रॅम वजनाचे 50 हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र खेचुन झाडीतुन माऊली हाईट्स सोसायटीच्या दिशेने पलायन केले.

यावेळी वंदना साबळे यांनी आरडा-ओरड केली असता, रस्त्यावरुन चालत जाणाऱ्या त्यांच्या भाच्याने सदर लुटारूंचा पाठलाग केला. मात्र सदर लुटारु त्याच्या हाती लागला नाही. त्यानंतर वंदना साबळे यांनी रबाळे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT