मुंबई

सिव्हिल इंजिनिअर मारहाण प्रकरण, आव्हाडांच्या तीन अंगरक्षक पोलिसांना अटक

पूजा विचारे

मुंबईः आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट वरुन राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या १५ ते २० समर्थकांनी सिव्हिल इंजिनिअर अनंत करमुसे यांना मारहाण केली होती. आव्हाडांच्या ठाण्यातील बंगल्यात ही मारहाण करण्यात आली होती. आता या प्रकरणात सहा महिन्यांनी वर्तकनगर पोलिसांनी तीन अंगरक्षक  पोलिसांना अटक केल्याचं समजतंय. दरम्यान न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सोमवारी अटक केलेल्या तिघांमध्ये मुंबईतील दोन आणि ठाण्यातील एक पोलिस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. वर्तकनगर पोलिसांनी ही कारवाई केली. घोडबंदर रोडवरील आनंदनगर भागात राहणारे अनंत करमुसे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकली होती. या पोस्टमध्ये करमुसे यांनी आव्हाडांचा फोटो वापरुन आक्षेपार्ह पोस्ट केली होती.  या पोस्टनंतर ५ एप्रिलला रात्री करमुसे यांना पोलिस आव्हाड यांच्या बंगल्यावर घेऊन गेले आणि १५ ते २० जणांनी त्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता. मारहाणीच्या वेळी आव्हाड देखील बंगल्यात उपस्थित होते असं करमुसे यांनी तक्रारीत उल्लेख केला. 

या प्रकरणात आव्हाडांचे अंगरक्षक म्हणून नियुक्त असलेले पोलिस देखील सहभागी असल्याचं करमुसे यांनी आपल्या तक्रारीत नमूद केलं होतं.  करमुसे यांच्या तक्रारीनंतर वर्तकनगर पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.  या मारहाणीच्या प्रकरणाला सहा महिने उलटल्यानंतर त्या तिघा अंगरक्षक पोलिसांना सोमवारी ताब्यात घेण्यात आलं. त्यांना जामीन मिळाला असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

Jitendra awhad 3 bodyguard policemen arrested anant karmuse assault case

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PLAYOFF SCENARIO: सनरायझर्स हैदराबादचा विजय, पण गुजरात टायनट्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचले? 'बाय वन गेट वन' ऑफर

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपले? SRHने विजयासह GT ला अंतिम ४ मध्ये पोहोचवले; १ जागा ३ स्पर्धक...

IPL 2026 Controversy : संजू सॅमसनने विजेच्या वेगाने बेल्स उडवल्या... OUT होताच हेनरिच क्लासन खवळला, अंगावर धावला Video

Gautam Adani: अमेरिकेत गौतम अदानींचा मोठा विजय! US मधील खटला कायमचा बंद; न्याय विभागाने आरोप मागे घेतले

Pune Council Seat Battle: पुणे विधान परिषद जागेसाठी राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच

SCROLL FOR NEXT