Jitendra Awhad criticize bjp on release of Aryan khan mumbai Sakal
मुंबई

आर्यन खानची मुक्तता हे इथल्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरो - जितेंद्र आव्हाड

माणसांमध्ये मानवता धर्मच नाही अशी टीका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर केली

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - आर्यन खानची काल झालेली मुक्तता हे इथल्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरो हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. चार महिने जेलमध्ये जाऊन आल्यावर एखाद्या बालमनावर काय परिणाम होतो याचा विचार आपल्या घरातील मुलांकडे पाहून केला पाहिजे. त्याच्यावर ठप्पा मारून त्याला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न हा अमानवी आहे. या माणसांमध्ये मानवता धर्मच नाही अशी टीका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर केली. आर्यन खान याची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर समीर वानखेडे यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे याबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर टीका करत उपरवाला सब देखता है असे बोलत वानखेडे यांच्यावर सूचक वक्तव्य केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण डोंबिवली जिल्हाच्या वतीने डोंबिवलीत जिल्हा कार्यकारिणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले असता त्यांनी भाजपावर टीका करत कार्यकर्त्यांना स्वतःमधील आग पेटवत ठेवा, काम करत रहा असा सल्ला दिला.

पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील टीका केली, त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी संभाजी राजांना खडे बोल सुनावले आहेत, याबाबत प्रतिक्रिया देताना मंत्री आव्हाड यांनी छत्रपती शाहू महाराज यातच सगळं आलं अशी बोलकी प्रतिक्रिया दिली सत्तर वर्षाच्या इतिहासात देशाची मान कायम ताठ राहील असच काम प्रत्येक पंतप्रधानाने केलं त्याचा आम्हाला अभिमान - मंत्री जितेंद्र आव्हाड

गेल्या आठ वर्षांत मी अस एकही काम केलेलं नाही ज्यामुळे लोकांचे डोके शरमेने खाली जाईल असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे यावर ते म्हणाले, हे खर आहे की मोदींनी कोणतेही असं काम केलं नाही की देशाची मान शरमेने खाली जाईल. किंबहुना कोणत्याही पंतप्रधानाने केल नाही. सत्तर वर्षाच्या इतिहासात देशाची मान कायम ताठ राहील असच काम प्रत्येक पंतप्रधानाने केलं त्याचा आम्हाला अभिमान आहे.

२७ गावांना पाणी देण्याची जबाबदारी सरकारला घ्यावी लागेल - जितेंद्र आव्हाड

27 गावात भेडसावणाऱ्या पाणी समस्ये विषयी लवकरच जलसंपदामंत्री सोबत बैठक लावली जाणार आहे. 27 गावांना पाणी देण्याची जबबदारी सरकारला घ्यावी लागेल. महानगरपालिकेला त्यासाठी आर्थिक मदत करावी लागेल, ते करण्याचं काम आम्ही करू. या गावांसाठी जास्तीत जास्त पाणी जलसंपदा मंत्र्यांकडून एमआयडीसीला देवून त्यांच्यामार्फत गावांना पाणी पुरवठा करण्याची मागणी जलसंपदा मंत्र्यांकडे करणार असल्याचे ते म्हणाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Funeral News LIVE Updates : अजित पवारांच्या पार्थिवावर 11 वाजता अंत्यसंस्कार

Ajit Pawar: “अरे बेट्यांनो… इतक्या लवकर मी जात नसतो!” ; अजितदादांचा शेवटचा निरोप, AI व्हिडिओ पाहून डोळे पाणावले

Ajit Pawar Funeral : दादांना भेटायची ही शेवटची पहाट... अजित पवारांच्या आठवणीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा अश्रूंचा बांध फुटला

अजितदादांनी ऐकलं नाही! रात्रीच कारने बारामतीला जाऊया म्हणालो होतो; चालक श्यामराव मनवेंना अश्रू अनावर

Ajit Pawar : लोकनेता गमावला; विविध मान्यवर नेत्यांकडून श्रद्धांजली

SCROLL FOR NEXT