Jitendra Awhad Esakal
मुंबई

Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक

रवींद्र देशमुख

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. हर हर महादेव चित्रपटावरून चित्रपटगृहात गोंधळ घातल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आल्याच सांगण्यात येत आहे. चित्रपटगृहात एका तरुणाला मारहाण झाली होती. शिवाय शो देखील बंद करण्यात आला होता. त्यामुळे मोठा वाद झाला होता. आव्हाड यांना वर्तकनगर पोलिस ठाण्यात अटक करण्यात आली आहे.

यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मला पोलिसांनी सांगितलं की, तुम्हाला अटक करावं लागेल. चित्रपटातून संपूर्ण मराठा समाजाचा अपमान केला गेला आहे. शिवाजी महाराजांना बदनाम करण्यात येत आहे. त्याला विरोध करण्यासाठी कारागृहात जावं लागत असेल तर मी सहज जाईल. जामिनासाठी देखील अर्ज करणार नाही, असंही आव्हाड म्हणाले.

आव्हाड यांनी ट्विट करून म्हटलं की, मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेहऱ्यावर अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हाला अटक करावी लागेल. हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही, असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Red Alert: पुण्यात सलग चौथ्या दिवशी पावसाची रिपरिप; घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ‘रेड’ अलर्ट

Pandharpur Air Ambulance: आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी प्रथमच एअर ॲम्बुलन्स; पंढरपूरहून पुणे-मुंबईत तातडीने हलविण्याची सुविधा

Pune FDA Action: पुण्यात एफडीएची मोठी कारवाई! जेएम रोडवरील 'मथुरा प्युअर व्हेज' हॉटेल बंद; अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन

Maharashtra Rain Alert : पावसाचा जोर वाढणार! मुंबई-कोकणला ऑरेंज, रायगड-पुणे-नाशिक घाटमाथ्याला रेड अलर्ट; पुढील 24 तास अतिधोक्याचे

LNG Supply: दिलासादायक बातमी! केंद्र सरकारने LNG पुरवठ्यावरील बंदी हटवली; भारतावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT