jitendra awhad speaks about ST protest
jitendra awhad speaks about ST protest google
मुंबई

'त्यांची मुंडकी छाटली होती', आव्हाडांकडून निषेध

नमिता धुरी

शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्त्वात शनिवारी आंदोलन करण्यात आले. शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याच्या घटनेनंतर अमरावतीच्या नेत्याला फ्रेंच राज्यक्रांती आठवते, याबद्दल आव्हाड यांनी आश्चर्य व्यक्त केले. या राज्यक्रांतीमध्ये लुईस १६ आणि मेरि अॅन्टेनिएट यांचे मुंडके छाटण्यात आले होते. त्यामुळे या अशा वक्तव्याचा भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने धिक्कार केला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी आव्हाडांनी इतिहासातील दाखले देत नेपोलियनचाही उल्लेख केला.

"आंदोलक समजा दरवाजा तोडून आत गेले असते तर काय झाले असते ?" असा प्रश्न उपस्थित करत आव्हाड यांनी चिंता व्यक्त केली. “८२ वर्षांचे साहेब झोपले होते. त्यांची पत्नी खालच्या मजल्यावर बसली होती. नात वरच्या मजल्यावर झोपली होती. नात वरून धावत येते. कोणीतरी घरात शिरत असल्याचे सांगते. पटापट दरवाजाला कड्या लावल्या जातात. लोकशाहीमध्ये असे कधीही घडले नाही. समजा आंदोलकांनी दरवाजा तोडला असता आणि ते आत गेले असते तर…”, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी व्यक्त केली.

जे सुरू आहे ते अराजक पसरवण्यासाठी सुरू आहे. आपण जन्मालाही आलो नव्हतो तेव्हा शरद पवार यांनी राजकारण सुरू केले आहे. नागपूरला ४४ अंश सेल्सिअस तापमानात पहिले भाषण केले होते, अशी आठवण आव्हाड यांनी सांगितली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता; पुढील चार दिवस दुपारनंतर ढगाळ हवामानाचा अंदाज

Vladimir Putin: 'आम्ही चर्चेस तयार पण...', पाचव्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच पुतिन यांची पाश्चिमात्य देशांना साद

MS Dhoni: 'थाला'ने गुंतवणूक केलेल्या कंपनीचा मेगा प्लॅन; पुण्यात उभारणार देशातील सर्वात मोठी फॅक्टरी

Yuvraj Singh on Rohit Sharma : 'जीवलग मित्राने वर्ल्डकप जिंकलेला पाहायचेय...' सिक्सर किंगने रोहित शर्माचे केले तोंड भरून कौतुक

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

SCROLL FOR NEXT