मुंबई

मुंबईतील पत्रकारांना हिनवणाऱ्या पत्रकाराच्या कानशिलात लगावली; बेशिस्त वागण्यामुळे जोरदार चोप

अनिश पाटील

मुंबई - एरवी एखाद्या घटनेचे वृतांकन करणारे पत्रकारच आज वृत्तांकनाचा विषय ठरले. केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या(एनसीबी) कार्यालयाबाहेर वृत्तवाहिनींच्या पत्रकारांमध्ये राडा झाला. यावेळी मुंबईचे पत्रकार चाय बिस्कूट वाले पत्रकार म्हणून हिनवणा-या रिपब्लिक वृत्तवाहिनीचे पत्रकार प्रदीप भंडारी याच्यासोबत इतर पत्रकारांची बाचाबाची झाली.

आपल्या विचित्र शैलीतून वृत्तांकन करणा-या भंडारी सर्व परिसरात फिरून वृत्तांकन करतात. गुरूवारी दोनवेळा ते इतर पत्रकारांच्या फ्रेममध्ये आले. त्यावेळी त्यांना फ्रेममध्ये न येण्यासाठी सांगितले असता भंडारीने ‘ये डिप्रेशन के मरीज पत्रकार बैठे है. चाय बिस्किट वाले पत्रकार है जो आपको खबर नही दिखाएंगे हम खबर दिखाएंगे’असे वृत्तांकन करू लागले. यावेळी इतर पत्रकारांनाही कॅमेरा फ्रेममध्ये घेऊन वृत्तांकन केल्यामुळे त्यावर इतर वाहिन्यांच्या पत्रकारांनी आक्षेप घेतला. त्यावरून चांगलीच बाचाबाची झाली.यावेळी भंडारीच्या कानशिलातही लगावण्यता आली. हा वाद एवढा वाढला, की पोलिसांना मध्यस्ती करून वाद मिटवावा लागला.

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT