file photo 
मुंबई

'या' कंपनीकडून कंत्राटदारांना मदतीचा हात 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोविड-19 महामारी आणि परिणामी सुरू असलेला लॉकडाउन हा नेमका सुगीच्या काळातच आल्याने कंत्राटदारांच्या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. या अशा अनपेक्षित प्रसंगी जेएसडब्ल्यू पेंट्‌सच्या कंत्राटदारांना मदतीचा हात देण्यासाठी काही विचारशील उपाययोजना राबविण्याचा निर्णय कंपनीने घेतला.

या कठीण परिस्थितीत जेएसडब्ल्यू पेंट्‌सच्या स्टार कॉन्ट्रॅक्‍टर पार्टनर प्रोग्रामद्वारे कंत्राटी भागीदारांच्या बॅंक खात्यात सुलभ आणि थेट हस्तांतरणाचा लाभ मिळणार आहे. याद्वारे सर्वच कंत्राटदारांना त्यांनी जमा केलेले इन्सेन्टीव आणि लॉयल्टी पॉईंट रोख रकमेत परावर्तित करणे शक्‍य होणार आहे. या अभूतपूर्व परिस्थितीत कंत्राटदारांना बॅंक खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम काढता येईल. या उपक्रमाचा लाभ बाजारातील 4,000 हून अधिक पेंटींग कंत्राटदारांना मिळणार आहे. 

हेही वाचा...महाविकास आघाडीच्या बैठकीत मोठा निर्णय 

जेएसडब्ल्यू पेंट्‌सची सुरुवात वर्षभरापूर्वी झाली. इतक्‍या कमी कालावधीत कंपनीने दक्षिण आणि पश्‍चिमेकडील विक्रेते आणि कंत्राटदार यांचे व्यवस्थापन करून व्यवसाय कार्यान्वित केला. जेएसडब्ल्यू पेंट्‌स स्टार कॉन्ट्रॅक्‍टर पार्टनर प्रोग्रामद्वारे या कंत्राटदारांना दरवेळी ऍपचा वापर करून कमावलेले सहभागीता आधारित इन्सेन्टिव्ह तसेच लॉयल्टी मोबाईल ऍपद्वारे जमवता येतात. अशाप्रकारे मागील वर्षभरात कंत्राटदारांनी मोठ्या प्रमाणावर पॉइंट जमा केले आहेत. या प्रोग्रामद्वारे कंत्राटदारांनी पॉइंट हे रोख-रकमेत रुपांतरीत करावे याकरिता त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्याकरिता जेएसडब्ल्यू पेंट्‌सने कस्टमर रिलेशनशीप ऑफिसर्सची नियुक्ती केली आहे. 

कंपनीतर्फे हॅंड सॅनिटायझर लवकरच बाजारात 
जेएसडब्ल्यू पेंट्‌स देशांतर्गत बाजारपेठेत आपले नवे हॅंड सॅनिटायझर सादर करण्यास सज्ज झाली आहे. ग्राहकांना सुरक्षा आणि स्वच्छता मिळावी या दृष्टीने विचारपूर्वक साह्य करण्याच्या कंपनीच्या बांधिलकीचा भाग म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. हे उत्पादन तयार करण्यासाठी तसेच सर्व बाजारपेठांमध्ये त्याचे वितरण करण्यासाठी जेएसडब्ल्यू पेंट्‌सने आवश्‍यक अशा सर्व मान्यता, परवानग्या आणि परवाने मिळवले आहेत. सिक्‍योरऑल हा हॅंड सॅनिटायझर ब्रॅंड येत्या काही दिवसांत बाजारपेठेत दाखल होणे अपेक्षित आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik sex scandal: खरातनंतर नवं सेक्स स्कँडल! चोरी गेलेला टॅब ठरला संकट, २०० व्हिडिओंनी उघड केलं मोठं रहस्य, तक्रारदारच अडकला

Pune Ring Road Work Accident : पुण्यात रिंग रोडच्या कामावेळी तरुणाचा बुडून मृत्यू, शिडीवर चढताना पाय घसरला अन्, ४० फूट नदीपात्रात कोसळला

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा परिषदेच्या विषय सभापती जाहीर

Ajinkya Rahane: सलग दुसऱ्या पराभवानंतर रहाणेचा टीकाकारांवर हल्लाबोल; ‘माझं यश काहींना पचत नाही, माझ्याविरोधात ठरवून अजेंडा’

'मला त्यावेळी खूप त्रास होत होता' महिनाभर अंथरुणाला खिळलेला ललित प्रभाकर, आजाराबद्दल बोलताना म्हणाला...' जो त्रास होत होता तो...'

SCROLL FOR NEXT