Bombay High Court 
मुंबई

दारु पिऊन यायचा कोर्टात! न्यायमूर्तीला नोकरीवरुन काढण्याचा निर्णय हायकोर्टाने ठेवला कायम!

Bombay High Court: दारु प्राशन करुन कोर्टात येणाऱ्या, वेळ न पाळणाऱ्या एका न्यायमूर्तीला दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- दारु प्राशन करुन कोर्टात येणाऱ्या, वेळ न पाळणाऱ्या एका न्यायमूर्तीला दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. न्यायमूर्तीचे कोर्टातील वर्तन चांगले नव्हते. त्यामुळे त्याची नोकरी गेली होती. त्यानंतर या न्यायमूर्तीने मुंबई हायकोर्टात धाव घेत दिलासा देण्याची मागणी केली होती. मात्र, कोर्टाने न्यायमूर्तीला फटकारले आहे. (Bombay High Court)

न्यायमूर्ती अनिरुद्ध पाठक यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांना सत्र कोर्टाने नोकरीमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. वेळेवर कामावर न येणे, नेहमी सुट्टी घेणे, कोर्टामध्ये दारु पिऊन येणे अशाप्रकारच्या वर्तनासाठी त्यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. अनेक कर्मचाऱ्यांनी देखील त्यांच्याविरोधात तक्रार केली होती. मद्य पिऊन कोर्टात येणे हा त्यांच्यावरचा प्रमुख आरोप होता.

हायकोर्टाने पाठक यांच्या याचिकेवर सुनावणी करताना म्हटलं की, न्यायिक अधिकाऱ्याने अशाप्रकारचे वर्तन करणे योग्य नाही. यामुळे न्यायपालिकेची प्रतिमा खराब होते. न्यायमूर्ती आणि न्यायिक अधिकाऱ्यांनी सन्मानजनक वर्तन करायला हवे. कोर्टाची प्रतिमा खराब होईल असं काहीही त्यांनी करायला नको, असं कोर्टाने म्हटलं. कोर्टाने अनिरुद्ध पाठक यांना दिलासा देण्यास नकार दिलाय.

न्यायमूर्ती एस चंदूरकर आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या पीठाने याप्रकरणी सुनावणी घेतली. खंडपीठाने म्हटलं की, न्यायिक अधिकारी वाईट वर्तन करत असतील तर कोर्ट त्यांना दिलासा देईल असा विचार कोणी करायला नको. न्यायिक अधिकाऱ्यांची प्रतिमा महत्त्वाची आहे. कारण, लोकांचे त्यांच्यावर लक्ष असते.

एखाद्या न्यायमूर्तीचे वर्तन चांगले नसेल, त्यावर प्रश्न उपस्थित केले जात असतील, तर अशा प्रकरणात आम्ही दिलासा देऊ शकत नाही. दरम्यान, अनिरुद्ध पाठक हे २०१० मध्ये दिवाणी कनिष्ठ न्यायाधीश म्हणून काम करत होते. काम करत असताना त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यानंतर नंदूरबार जिल्ह्यातील मुख्य न्यायमूर्तींनी पाठक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कारवाई करत पाठक यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Mohibullah Ansari : कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी? अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; जाणून घ्या IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

Ladki Bahin Yojana August 2026 Installment GR : लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याचा GR आला; खात्यात 1,500 जमा होणार की 3,000 शासन निर्णयात नेमकं काय?

Vinod Kambli ने ठाण्याच्या हॉस्पिटलमधून पोस्ट केला Video; प्रकृतीबाबत सांगायचं सोडून, काय बोलतोय ऐका; नेटकरी म्हणाले...

Latest Marathi News Live Update : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; २२ तासांपासून विसर्जन मिरवणूक, थोड्याच वेळात बाप्पाला निरोप

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

SCROLL FOR NEXT