Kalwa St Depot Sakal
मुंबई

Thane News : कर्मचाऱ्यांचा तुटवडा! अवघे १०० कर्मचारी हकतायत कळवा एसटी कार्यशाळेचा कारभार

एसटी महामंडळाला लागलेले समस्यांचे ग्रहण काही पाठ सोडत नसल्याचे दिसून येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

ठाणे - एसटी महामंडळाला लागलेले समस्यांचे ग्रहण काही पाठ सोडत नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता, एसटी महामंडळाच्या कळवा विभागीय कार्यशाळेत कर्मचाऱ्यांचा तुटवडा असून ४०० कर्मचाऱ्यांचे काम हे १०० कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. त्यामुळे त्याचा परिमाण कर्मचाऱ्यांवर होत असून त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी भाजपचे आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेत, पत्रव्यवहार करीत समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.

एसटी महामंडळाचे कळवा विभागीय कार्यशाळेचे बांधकाम हे २० वर्षे जून असून पूर्वी याठिकाणी ४०० च्या आसपास कर्मचारी कार्यरत होते. परंतु २०१७ नंतर नवीन कर्मचाऱ्यांचीच भरतीच न झाल्याने ४०० कर्मचाऱ्यांचे काम १०० कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे.

या ठिकाणी आरटीओ पासीगंच्या गाडयांची कामे तसेच ८ डेपोच्या गाडयांच्या रिपेअरिंगचे कामे, बॉडीची कामे, पेंटींगची कामे, तसेच इंजिन गेअरबॉक्स, क्लचप्लेट, क्रशर प्लेट, पिनीअन, जॉईंटस रेडीएटर, पाटे, वेल्डींग, अपोहस्टर खाते, इलेक्ट्रीशिअनची कामे, फ्रंट अ‍ॅक्सल ही सर्व रिपेअरिंगचे कामे जवळपास ७०० गाडयांची कामे केली जातात ही कामे करत असतांना कर्मचा-यांना अनेक समस्या भेडसावत आहेत.

आरटीओ पासिंग गाडयांची कामे ३ दिवसाचे काम एका दिवसामध्ये सक्तीने करुन घेतले जाते. नाही केल्यास प्रशासकीय दबाव टाकला जातो. म्हणजेच बदली करून चार्जशिट घेऊन पंचिंग कार्ड जमा करुन अर्धा दिवसाचा पगार कापुन अशा धमक्या देऊन कर्मचा-यांची मानसिक खराब केली जाते.

हेवी वर्क असल्याने ५० टक्के कर्मचारी हे शारिरीक व्याधीनी त्रस्त आहेत. व काही कर्मचारी नोकरी सोडण्याच्या तयारीत आहेत. संपुर्ण वर्कशॉपचे बांधकाम पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे ९० ते १०० कर्मचा-यांचा जिव धोक्यात आहे, अशी समस्या कर्मचाऱ्यांनी भाजप आमदार संजय केळकर यांच्याकडे मांडली.

टॉयलेट, बाथरुम अस्वच्छ व पडक्या स्थितीत आहे व तसेच वर्कशॉपच्या आवारामध्ये साफसफाई केली जात नाही, अपघात झाल्यास प्रथमोपचार पेटी व रुग्णवाहिकेची सोय नाही. अत्याधुनिक यंत्र सामुग्री तसेच हायड्रॉलिक जाक उपलबध नाहीत, आदी समस्या कर्मचाऱ्यांनी मांडल्या. या समस्या सोडविण्यासाठी संबधीत यंत्रणेकडे पाठपुरावा केला जाईल आणि कर्मचाऱ्यांना न्याय दिला जाईल.

- संजय केळकर, आमदार, भाजप.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction live : मुंबई इंडियन्सची स्वस्तात मस्त डील! रोहित शर्माला तगडा ओपनिंग पार्टनर मिळाला, झाली घरवापसी; चिंता मिटली

Mumbai News: कायदा पोलिसांना लागू नाही का? उच्च न्यायालयाचा सवाल; केंद्राला भूमिका स्पष्‍ट करण्याचे आदेश

IPL 2026 Auction: वेंकटेश अय्यरची किंमत तब्बल १६.७५ कोटींनी झाली कमी! माजी विजेत्यांनी केलं खरेदी

IPL 2026 Auction live : खिशात नाही दाणा अन्... ! Mumbai Indians च्या खेळीने सारे चक्रावले; CSK च्या रणनीतीने KKR चा खिसा कापला...

Latest Marathi News Live Update : अरूप बिस्वास यांची ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून क्रीडा मंत्री पदावरून मुक्त करण्याची विनंती

SCROLL FOR NEXT