mobile towers esakal
मुंबई

कल्याणमध्ये एअरटेल मोबाईल टॉवरसाठी वीजचोरी

8 लाख 19 हजारांच्या वीजचोरी प्रकरणी महावितरणने केला गुन्हा दाखल

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याणातील (Kalyan) कृषी उत्पन्न बाजार समिती इमारतीच्या छतावर असलेल्या एअरटेल मोबाईल टॉवरसाठी (Airtel mobile tower) फिडर पिलरमधून थेट वीज चोरी (electricity robbery) केली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सहा महिन्यात 56 हजार 150 युनिट वीज (Electricity unit) वापरली गेली असल्याचे उघड झाले असून याप्रकरणी मे. सुयोग टेलेमॅटिक्स विरुद्ध महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात महावितरणने गुन्हा दाखल (police Fir) केला आहे.

महावितरणच्या वीजचोरी शोध मोहिमेत शिवाजी चौक शाखा एकचे सहायक अभियंता मोहम्मद आरिफ शब्बीर खान, कर्मचारी विलास गायकवाड यांच्या पथकाने 8 ऑक्टोबर रोजी कल्याण पश्चिमेतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सी टाइप इमारतीच्या छतावरील मोबाईल टॉवरच्या वीज पुरवठ्याची तपासणी केली. याठिकणी अधिकृत वीजजोडणी न घेता विनामीटर थेट वीजवापर होत असल्याचे पथकास आढळून आले.

सुयोग टेलेमॅटिक्स कंपनीने एअरटेल मोबाईल टॉवरसाठी काळ्या रंगाची 40 मीटर केबल वापरून फिडर पिलरमधून थेट व अनधिकृतपणे वीजचोरी केल्याचे तपासणीतून उघड झाले. 18 मे पासून वीज चोरीचा हा प्रकार सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे. कंपनीने सहा महिन्यात 8 लाख 19 हजार रुपये किमतीची वीज चोरी केली आहे. त्यानुसार वीज चोरीचे देयक व दंड भरण्याबाबत सुयोग टेलेमॅटिक्सला नोटीस बजावण्यात आली होती.

मात्र कंपनीने रक्कम भरली नसल्याने त्यांच्या विरुद्ध

सहाय्यक अभियंता खान यांच्या फिर्यादी वरून महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहली, शुभमन गिलचे शतक, टीम इंडियाचा पहिल्या वन डेत दणदणीत विजय; मालिकेत आघाडी

Praniti Shinde: दुष्काळ जाहीर केला, पण आर्थिक मदत कुठे?’; मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदेंचा सरकारवर निशाणा

Nagpur Crime: साक्ष दिल्याचा बदला घेण्यासाठी पाठलाग; हद्दपार आरोपीने तेलमालिश करणाऱ्यावर चाकूने केले तीन वार

Latest Marathi News Live Update : दिवसभरात काय घडलं? देशविदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीची Century! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; ७४ चेंडूंत इतिहास भूगोल बदलला...

SCROLL FOR NEXT