मुंबई

कल्याण: 'ते' जोडपं ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मोकळ्या जागेत पडलं अन्...

सकाळी सव्वाच्या नऊच्या सुमारास प्लॅटफॉर्म नंबर ४/५ वर ही घटना घडली.

दीनानाथ परब

मुंबई: मुंबईत रेल्वे प्रवासात (Train journey) वेगवेगळे अपघात होत असतात. यामध्ये अनेकजण आपल्या प्राणांना मुकतात. काहीवेळा दैवाची साथ आणि नशीब बलवत्तर असल्यामुळे अनेकांचा प्राण वाचले आहेत. रविवारी कल्याण (Kalyan) रेल्वे स्थानकात असाच दुर्देवी अपघात घडला. पण सर्तक तिकिट तपासनीस (TC) आणि प्रवाशांमुळे सुदैवाने एका जोडप्याचे प्राण वाचले.

सकाळी सव्वाच्या नऊच्या सुमारास प्लॅटफॉर्म नंबर ४/५ वर ही घटना घडली. धावती ट्रेन पकडताना एक जोडपं, प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत पडलं. हे जोडपं उद्यान एक्स्प्रेस (०१३०१)मध्ये चढण्याचा प्रयत्न करत होतं. त्या धडपडीत दोघेही प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत पडले, असे कल्याणचे सीटीआय जसपाल सिंह राठोड यांनी सांगतिले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

त्याचवेळी तिथे ड्युटीवर टीसी रणजीत कुमार मदतीसाठी धावले, त्यांनी ट्रेनमधील प्रवाशांना चैन खेचण्याची सूचना केली. काही सेकंदात ट्रेन थांबली, तो पर्यंत तीन ते चार डब्बे पुढे निघून गेले होते. सुदैवाने दैव बलवत्तर असल्याने त्या जोडप्याला कुठलीही इजा झाली नव्हती. रणजीत कुमार यांनी अन्य प्रवाशांच्या मदतीने त्या जोडप्याला बाहेर काढलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule: बावनकुळेंच्या डोळ्यात पाणी! मनोज जरांगेंच्या टीकेमुळे भावुक; म्हणाले, माझंही कुटुंब आहे...

Sukhbir Singh Badal: पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडमध्ये जीवघेणा हल्ला; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया समोर, नेमकं काय घडलं?

Vastu Tips: पाकिटात काय ठेवावे आणि काय ठेवू नये? वास्तुशास्त्राचे 'हे' उपाय दूर करू शकतात पैशांची अडचण!

Vaibhav Sooryavanshi : भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या वैभवला कसा रोखणार? हरभजनने सांगितलं गेमप्लॅन

Bhiwandi: भिवंडी महापालिकेला 'सर्वोच्च' दणका! कचरा उचलणाऱ्या कंत्राटदारास १५ कोटी देण्याचे न्यायालयाचे निर्देश

SCROLL FOR NEXT