kalyan
kalyan 
मुंबई

कल्याण - भाजपाच्या वतीने गणेशोत्वानिमित्त विशेष दरात बससेवा

रविंद्र खरात

कल्याण - कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या कालावधीत कोकणात चाकरमानी आपल्या परिवारासहित मोठ्या संख्येने जातात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कल्याण पूर्व भाजपाच्या वतीने विशेष दरात बसेस सोडण्यात येते. यावर्षी मंगळवार ता 11 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास विशेष एसटी बसेस गणपती बाप्पा मोरयाच्या जय घोषात सोडण्यात आल्या. 

कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, विठ्ठलवाड़ी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापुर, मोहना, टिटवाला, ठाकुर्ली, शहाड, डोंबिवली परिसर मध्ये कोकणातील नागरिक मोठ्या प्रमाणात राहतात, कोकणात गौरी गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. जातो त्यानिमित्त येथील नागरीक आपल्या परिवारासहीत कोकणात जातो. त्यांना जाण्यासाठी भाजपा कल्याण पूर्वच्या वतीने मागील 4 वर्षापासून विशेष दरात एसटी बसेस सोडण्यात येते. 

यावर्षी कल्याण पूर्व पालिका ड प्रभाग क्षेत्र कार्यालय येथून मंगळवार ता 12 सप्टेंबर रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास भारतीय जनता पार्टी कल्याण पुर्वच्या वतीने व आमदार गणपत गायकवाड आणि भाजप सरचिटणीस संजय मोरे यांच्या सहकार्याने गौरी-गणपतीनिमित्ताने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी माफक दरात विशेष बस सोडण्यात आल्या. मालवण, रत्नागिरी, गुहागर, चिपळूण, खेड, महाड पोलादपूर अशा एकूण सहा बसने तीनशे प्रवासी कोकणात गेले. विशेष म्हणजे जे कुटुंब या बस मधून प्रवास केला त्यांचा पूजा साहित्य देऊन सत्कार करण्यात आला तर अन्य प्रवाश्याना पाण्याच्या बाटल्या आणि बिस्कीटचे वाटप करण्यात आले.तर यावेळी एसटी बसेसच्या वाहक आणि चालकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांचे पुत्र वैभव गायकवाड, सभापती सुभाष म्हस्के, संजय मोरे, संदीप तांबे रवि हराळे, अरुण दिघे, विजय उपाध्याय, निलिमा महाजन, वंदना मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. 

कोकणात जाण्यासाठी बसेस ने नागरिक जातात मात्र रस्ते खराब त्यामुळे लागणारा वेळ लागतो यासाठी कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्या माध्यमातून राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कल्याण रेल्वे स्थानकातून विशेष मेल गाड्या सोडाव्यात यासाठी साकडे घालणार असल्याची माहिती आयोजक संजय मोरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT