thief arrested  sakal media
मुंबई

रिक्षा चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या कल्याण पोलिसांनी मुसक्या आवळल्या

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : रिक्षा चोरून (Auto rickshaw robbery) त्याची विक्री करणाऱ्या सराईत चोरट्यास (Thief arrested) पकडण्यात कल्याण (kalyan) गुन्हे अन्वेषण विभागास (CID) यश आहे आहे. हा चोरटा 17 वर्षाचा असून त्याच्या नावावर 7 चोरीचे गुन्हे दाखल (robbery cases) असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने त्याला अटक केली असून 3 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

मानपाडा रोड येथे एक चोरीची ऑटो रिक्षा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास पाटील, फौजदार मोहन कळमकर, हवालदार दत्ताराम भोसले, राजेंद्र खिलारे यांच्या पथकाने क्लासिक हॉटेल समोर सापळा रचून पोलिसांनी एका व्यक्तीस ताब्यात घेतले. तपासात त्याच्याकडून 2 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या तीन रिक्षा जप्त करण्यात आल्या. यातील एक रिक्षा चोरीला गेल्याची तक्रार ठाणे येथील कासारवडवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तसेच त्याच्यावर डोंबिवली पोलीस ठाण्यात 4 व तुर्भे, दिंडोशी व कोळसेवाडी पोलीस ठाण्यात प्रत्येकी 1 चोरीचा गुन्हा दाखल आहे. या 17 वर्षीय अल्पवयीन बालकास पुढील कायदेशीर कारवाईसाठी कासारवडवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT