Kalyan CID sakal media
मुंबई

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी गजाआड; कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : मानपाडा पोलीस ठाण्यात (Manpada Police station) दाखल चोरीच्या गुन्ह्यातील (Robbery Crime) दोन आरोपींना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने (kalyan CID) अटक केली (culprit arrested) आहे. ऋतीक घरत व विक्रम पाटील अशी अटक आरोपींची नावे असून त्यांच्यावर ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई, पालघर आदी पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल (Robbery cases) आहेत.

मानपाडा परिसरातील खोणी गाव, निळजे गावातील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचा पोलीस शोध घेत होते. कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार सचिन पाटील व पोलीस शिपाई गुरुनाथ जरग यांना आरोपी ऋतीक हा नवी मुंबई खारघर परिसरात वावरत असल्याची माहिती मिळाली. त्याचा ठावठिकाणा शोधुन गुन्हे शाखा घटक 3 च्या पथकाने खारघर पोलीस यांची मदत घेत ऋतीक याला सापळा रचुन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपासाच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार विक्रम याच्या मदतीने केला असल्याचे सांगितले.

पोलिसांनी ऋतीक याला सोबत घेऊन तळोजा जवळील रोहिजनगाव येथून विक्रम याला ताब्यात घेतले. त्यांनी मानपाडा परिसरातील निळजे गावातील काळूबाई चौक, श्रीकृष्ण मंदिरासमोर कोळेगांव व शैलेश हॉटेल खोणीगांव तसेच तळोजा (धारणेगाव), याठिकाणी दोघांनी मिळून चोरी केल्याचे सांगितले. त्यांच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल 3 गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच तळोजा (धारणेगाव) याठिकाणी मोटर सायकल चोरी केले बाबत गुन्हा उघडकीस आला आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 45 हजार रुपये किमतीची मोटार सायकल जप्त केली आहे. मानपाडा पोलीसांच्या ताब्यात आरोपिणं देण्यात आले आहे. त्यांच्यावर ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, पालघर व नवी मुंबई येथे गुन्हे दाखल असून त्याचा अधिक तपास सूरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT