Dombivli Crime sakal
मुंबई

Dombivli Crime : गायी म्हशी पानवण्या करिता दिले जाणारे 'ऑक्सीटोसीन' इंजेक्शनचे बेकायदेशीर उत्पन्न करणाऱ्यास अटक

Dombivli Crime : गायी व म्हशी पानवण्याकरिता देण्यात येणारे ऑक्सीटोसीन इंजेक्शन हे बेकायदेशीर रित्या तयार करून त्याची विक्री करणाऱ्या एकाला कल्याण गुन्हे शाखेने अटक केली आहे.

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

कल्याण पश्चिम येथील बिस्मिल्ला हॉटेल जवळ एका चाळीतील रूममध्ये एक व्यक्ती गायी व म्हशी पानवान्याकरीता देण्यात येणारे ऑक्सीटोसीन इंजेक्शन बनविण्याकरीता लागणारे औषध एक इसम अनधिकृतपणे उत्पादन करीत असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेस मिळाली होती. अन्न व औषध प्रशासन, कोकण विभागाचे औषध निरीक्षक संजय मोहनसिंग राठोड यांना मंगळवारी कल्याण गुन्हे शाखेने कारवाईसाठी बोलावून घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून पोलिसांनी मसी याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने निस्सार मौलवी चाळीत भाड्यावर रून घेतली होती. त्यामध्ये गायी व म्हशी पानवान्याकरीता देण्यात येणारे ऑक्सीटोसीन इंजेक्शन मध्ये वापरले जाणारे औषधी इव्याचे उत्पादन तो करीत आहे. सदर रूममध्ये पोलिसांनी छापा टाकला असता तेथून तयार करण्यात आलेले इंजेक्शन, त्यासाठी लागणारा कच्चा माल, मशीन जप्त करण्यात आले आहे.

या इंजेक्शनमुळे गायी व म्हशीच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याने तसेच ऑक्सीटोसिन इंजेक्शन दिलेल्या गायी म्हशीच्या दुधापासुन मानवी आरोग्यास धोका निर्माण होत असल्याने मसी याच्या विरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात औषधे व सौंदर्य प्रसाधणे कायदा व प्राण्यांना कुरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Heatwave: मुंबईचं तापमान ४० अंशांवर का पोहोचलं? तज्ज्ञांनी कारणच सांगितलं; मोठा खुलासा आला समोर

Horoscope News : उद्या 12 मार्चपासून 'या' 4 राशींना लाभेल नशीबाची पूर्ण साथ; अडकलेले पैसे येतील परत, अचानक मिळेल मोठी खुशखबर

IPL 2026 Schedule: परंपरेला तडा! RCB vs CSK हे आयपीएल २०२६च्या पहिल्याच सामन्यात भिडण्याचा अंदाज; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या भद्रकाली परिसरात दहावीच्या विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रस्त्यावर पार्किंगसाठी ऑड-ईवन नियम लागू; मुंबई ट्रॅफिक पोलिसांचा मोठा निर्णय, काय बदल होणार?

SCROLL FOR NEXT