मुंबई

Kalyan Crime: कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार, कॅब चालकाकडून तरुणीचा विनयभंग

तरुणीने काम आटपून घरी जाण्यासाठी बुक केली कॅब, कॅब चालकाचा प्रवासादरम्यान धक्कादायक प्रकार

Manoj Bhalerao

Kalyan Crime:कल्याणमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कल्याण पूर्वेत एका तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. शनिवारी (दि.१४ ऑक्टोबर) मध्यरात्रीच्या सुमारात ही घटना घडली. ही मुलगी नवी मुंबईहून कल्याणच्या दिशेने कॅबने येत होते, यावेळी कॅब चालकाने तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर तरुणीने आरडाओरड करताच कॅब चालकाने पळ काढला. त्यानंतर मुलीने थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी या कॅब चालकाविरोधात तक्रार नोंदवली आहे.

ही तरुणी नवी मुंबईतील एका कंपनीच्या कार्यालयात कामाला आहे. काल रात्री ती काम झाल्यावर घरी येण्यासाठी निघाली. यावेळी तिने एक कॅब बुक केली. ज्यावेळी प्रवास सुरु झाला, तेव्हा अचानक चालकाने तिचा विनयभंग करायला सुरुवात केली. त्यानंतर तरुणीने स्वत:चा बचाव करण्यासाठी मदतीसाठी आरडाओरड केली. तेव्हा चालकाने तेथून पळ काढला. पीडित मुलीने कल्याणमधील कोळशेवाडी पोलीस ठाण्यात कॅब चालक राकेश मिश्रा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या कॅब चालकाचा चालकाचा शोध सुरु केला आहे.

कल्याणनजिकच्या परिसरात मागच्या काही महिन्यांपासून विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ होते. त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

सायनमध्ये डॉक्टरचा हायव्होल्टेज ड्रामा! नोकरीवरून काढल्याच्या रागात थेट टॉवरवर चढला अन्...; अंगावर काटा आणणारा Video Viral

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

SCROLL FOR NEXT