Kalyan Railway
Kalyan Railway 
मुंबई

कल्याण : रेल्वे स्थानकाशेजारील स्कायवॉक बंद करण्याची नागरिकांची मागणी

सुचिता करमरकर

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकालगत असलेल्या स्कायवॉकवर मागील काही दिवसात लुटीच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे हा स्कायवॉक रात्रीच्या वेळी बंद ठेवण्यात यावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. यावर उपाययोजना म्हणून रात्री बारानंतर हा स्कायवॉक बंद करता येईल का? तसेच स्कायवॉक परिसरात सीसीटीव्ही आणि अधिक प्रकाश असावा यासाठी दिव्यांची व्यवस्था केली जावी, अशी अपेक्षा अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी व्यक्त केली आहे.

कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्याशी यासंदर्भात चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. मागील दोन महिन्यात रात्री उशिरा घरी परत येणाऱ्या नागरिकांना स्कायवॉकवर लुटण्याच्या घटना घडल्या आहेत. यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. हे आरोपी नशेच्या आहारी गेलेले आहेत, असेही कराळे यांनी सांगितले. 

रात्री उशिराने स्कायवॉकचा वापर करणाऱ्या नागरिकांना कटर, सुरीचा धाक दाखवून त्यांच्याजवळील मुद्देमाल लुटण्याच्या घटना मागील दोन महिन्यात कल्याण रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉकवर घडल्या होत्या. यासंदर्भात पोलिस स्थानकात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रेल्वेस्थानक परिसर तसेच स्कायवॉक वरील रात्रीची गस्त वाढवली. याच दरम्यान स्कायवॉकवर रात्री मुक्काम करणाऱ्या आणि नशेच्या आहारी गेलेल्या आरोपींचा पोलिसांना छडा लागला. हे आरोपी एकट्या-दुकट्या जाणाऱ्या प्रवाशाला हेरून त्याला शस्त्राचा धाक दाखवून त्याच्याकडील वस्तू लुटत असल्याचे तपासात निष्पन्न झाले, अशा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

स्कायवॉकवरील सुरक्षेचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने रात्री बारानंतर स्काय वॉक बंद करता येतील का? हा पर्याय पुढे आला. स्कायवॉकच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी कल्याण-डोंबिवली महापालिकेची असल्याने या संदर्भात पालिका आयुक्तांशी चर्चा करून रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत स्कायवॉक बंद करता येईल का? यावर निर्णय घेतला जाईल. यासंदर्भात पालिकेशी पत्रव्यवहार करण्यात येईल, अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिली. या परिसरात रेल्वे स्थानक परिसरातील सुरक्षिततेच्या दृष्टीने तेथील फेरीवाले तसेच टपरीवाले यांच्यावरही पालिकेच्या माध्यमातून नियंत्रण आणण्याबाबतही चर्चा करण्यात येणार आहे.

स्कायवॉक तसेच रेल्वे स्थानक परिसरातील सुरक्षिततेबाबत पोलिसांकडून येणाऱ्या प्रस्तावावर पालिका नक्कीच विचार करेल. मात्र या सर्व गोष्टी अमलात आणण्यापूर्वी त्याची व्यवहार्यता तसेच कायदेशीर बाजू पडताळण्यात येतील.
- गोविंद बोडके, आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

SCROLL FOR NEXT