Kalyan: sakal
मुंबई

Kalyan: बाळे गावातील गणपती मंदिरात भाविकांची गर्दी, अंगारकी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रिघ

Angaraki Chaturthi : दर्शनासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी ग्रामस्थांनी उत्तम अशी व्यवस्था केली आहे.

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

Dombivli: अंगारकी चतुर्थीनिमित्त ठाणे जिल्ह्यातील बाळे गावातील प्राचीन गणपती मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे. अंगारकी निमित्त श्री गणेशाचा गाभारा आकर्षक फुलांनी सजविण्यात आला आहे.

अत्यंत मंगलमय वातावरणात भाविक गणेशाचे दर्शन घेत आहेत. तर दर्शनासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी ग्रामस्थांनी उत्तम अशी व्यवस्था केली आहे.

ठाणे तालुक्यातील बाळे गावात प्राचीन श्री गणेशाचे मंदिर आहे. या मंदिरात भाविक मोठ्या संख्येने गणेशाच्या दर्शनासाठी येत असतात. मंगळवारी अंगारकी चतुर्थी निमित्त पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली असून भाविकांच्या लांबच लांब रांगा या परिसरात लागल्याचे दिसून आले आहे.

ठाणे रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या या गणेश मंदिरात दोन्ही जिल्ह्यातील भाविक प्रत्येक चतुर्थीला दर्शनासाठी येत असतात. विशेष म्हणजे माघी गणेशोत्सव काळात बाळे गावात घरोघरी श्री गणेशाची स्थापना न करता या मंदिरातील गणपतीची पूजा अर्चा केली जाते. एक गाव एक गणपती एक गणेशोत्सव येथे साजरा करण्यात येतो. त्यामुळे या मंदिराला वेगळे असे महत्त्व प्राप्त आहे.

मंगळवारी अंगारकी निमित्त गणपती मंदिराला तसेच देवाच्या गाभाऱ्याला आकर्षक अशा फुलांची आरास करण्यात आली आहे.

मंगलमय वातावरणात तासन तास रांगेत उभे राहून भाविक दर्शन घेत आहेत. दर्शनसाठी वेळ लागत असला तरी येथील ग्रामस्थांनी भाविकांसाठी उत्तम सोय केल्याने भाविकांनी ग्रामस्थांच्या नियोजनाचे स्वागत केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT