vishvanath bhor  sakal
मुंबई

Kalyan: नालेसफाई नीट झाली नाही तर केडीएमसी अधिकारी कंत्राटदारांची गय नाही

आमदार विश्वनाथ भोईर यांचा सज्जड दम, केडीएमसीला दिला 5 दिवसांचा अल्टीमेटम

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

Kalyan News: पावसाळा तोंडावर आला तरी शहरातील नाल्यांची नीट सफाई झाली नाही. दरवर्षी पहिल्या पावसात नाले, गटारे तुंबून पाणी साचून शहराची वाट लागते. कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी शुक्रवारी शहरातील नाल्यांची पाहणी केली.

यावेळी नाल्यांची अवस्था पाहून आमदार भिइर यांनी केडीएमसीला नालेसफाईसाठी पाच दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. नालेसफाई जर नीट झाली नाही तर केडीएमसी अधिकारी आणि कंत्राटदारांची कोणतीही हयगय केली जाणार नसल्याचा सज्जड दम आमदार विश्वनाथ भोईर यांनी भरला आहे.

पावसाळ्याच्या तोंडावर शहरांतील नालेसफाई व्यवस्थित झाल्या नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी आमदार भोईर यांच्याकडे केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर आमदार भोईर यांनी कल्याणातील प्रमुख नाल्यांची आज पाहणी करत केडीएमसीला हा इशारा दिला.

पावसाळ्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र कल्याण पश्चिमेतील नाल्यांची सफाई योग्य तऱ्हेने होत नसल्याच्या तक्रारी आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्याची दखल घेत आमदार भोईर यांनी आज तातडीने कल्याण पश्चिमेतील स्टेशन रोड आणि बैल बाजार येथील प्रमुख नाल्यांची केडीएमसी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.

त्यावेळी या नाल्यांमध्ये कचरा तसाच साचलेला आढळून आल्याने संतप्त झालेल्या आमदार भोईर यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याचे दिसून आले. यावेळी केडीएमसी शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

हा जनतेचा पैसा आहे, कोट्यावधींची उधळपट्टी होऊ देणार नाही - आमदार विश्वनाथ भोईर

नाले सफाईसाठी केडीएमसीकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र हा सर्व पैसा जनतेच्या खिशातून आलेला असून त्याची उधळपट्टी आपण होऊ देणार नाही अशा शब्दांत आमदार भोईर यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना सुनावले.

तसेच यावेळी केडीएमसी अभियंता घनश्याम नवांगुळ यांनी नालेसफाई केली असल्याचे आमदार भोईर यांना सांगितले. मात्र नालेसफाई झाली असे तुम्ही सांगता मग नाल्यात हा कचरा आणि गाळ कसा काय आहे? ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी करणारी आणि लोकांच्या डोळ्यात धूळफेक करणारी नालेसफाई आपल्याला मान्य नाही.

लोकांना आम्हाला उत्तरे द्यावी लागतात असे सांगत पुढील 5 दिवसांत कल्याण पश्चिमेतील सर्व प्रमुख नाल्यांची सफाई योग्य तऱ्हेने झाली पाहिजे. आपण पाच दिवसांनी पुन्हा पाहणी करू आणि आपल्याला कुठे नाले सफाई झाली नसल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी आणि कंत्राटदाराची आपण कोणतीही गय करणार नाही असा सज्जड दम आमदार विश्वनाथ भोईर यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT