KDMC Work
KDMC Work sakal media
मुंबई

'KDMC' चा भोंगळ कारभार; सीमेंट काँक्रीटीकरण झाल्यानंतर प्रशासनाला जाग

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : रस्त्याचे डांबरीकरण केल्यानंतर तो रस्ता जलवाहिनीच्या कामांसाठी (Water pipeline work) खोदायचा आणि काम झाल्यानंतर त्याची डागडुजी न करता तो तसाच ठेवायचा ही कल्याण-डोंबिवली महापालिकेची (KDMC) तशी जुनीच सवय. रस्त्यांचे सीमेंट कॉंक्रीटीकरण (cement concrete road) झाल्यानंतर नागरिकांना चांगल्या रस्त्यांची सुविधा मिळेल असे बोलले जात असले तरी पालिकेची जुनी सवय काही जात नसल्याचा प्रत्यय मंगळवारी आला. रस्त्याचे सीमेंट कॉंक्रीटीकरणचे काम पूर्ण झाल्यानंतर जलवाहिनीचे काम बाकी राहील्याने दावडी येथील सीमेंटचा रस्ता चक्क तोडण्यात आला आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी (MNS) पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारल्याने तुर्तास पालिकेकडून हे काम थांबविण्यात आले आहे.

कल्याण शीळ रोडचे सीमेंट कॉंक्रीटीकरणचे काम एमएसआरडीसीच्या माध्यमातून करण्यात येत असून गेले अनेक वर्षे रस्त्याचे काम सुरु आहे. या रस्त्याच्या कामाच्या दर्जाविषयी यापूर्वी अनेकदा प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. तसेच रस्त्याचे संथ गतीने सुरु असलेल्या कामाचा फटका वाहनचालकांना बसत आहे. वाहतूक कोंडी, वाहनांचे अपघात, रस्त्यावरील धुरळा यामुळे हा रस्ता कायम चर्चेत राहीला आहे. त्यातच शीळ रोडवरील दावडी जवळील सीमेंटचा तयार झालेला रस्ता तोडण्यात आल्याने कल्याण डोंबिवली महापालिकेचा आणि एमएसआरडीसीचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

मंगळवारी सकाळी रस्ता तोडण्यात येत असल्याचे मनसेचे शहर सचिव अरुण जांभळे यांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी जाऊन ठेकेदारास यासंबंधी विचारणा केली. यावेळी ठेकेदार विमल यांनी केडीएमसीच्या सूचनेनुसार जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यासाठी रस्ता खोदण्यात आल्याचे सांगितले. कॉंक्रीटचा रस्ता तयार होण्यापूर्वी हे काम नाही सुचले का? जनतेच्या पैशाचा अपव्यय सुरु असून मनसे हे सहन करणार नसल्याचे सांगत मनसे पदाधिकाऱ्यांनी ठेकेदारास नारळ आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करत या घटनेचा निषेध नोंदविला. मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर पालिका प्रशासनाच्यावतीने हे काम तत्काळ थांबविण्यात आले आहे.

रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे, खड्ड्यामुळे कल्याण डोंबिवलीकर कायम हैराण असतात. ओरड झाल्यानंतर पालिका प्रशासन पावसाळ्याच्या आधी रस्त्यांचे डांबरीकरण करत असे. डांबरीकरण होत नाही तोच काही दिवसांत जलवाहिनीची कामे, गटारांची कामे यामुळे पालिका प्रशासनाकडून रस्ते खोदण्यात येत असत. त्यानंतर तो रस्ता डागडुजी न करता तसाच सोडून दिला जात असल्याने चांगले रस्ते असे नागरिकांना कधी मिळालेच नाहीत. आत्ता रस्त्यांचे सीमेंट कॉंक्रीटीकरण होत असल्याने आत्तातरी चांगले रस्ते मिळतील या आशेवर नागरिक असतानाच रस्त्याचे सीमेंट कॉंक्रीटीकरण झाल्यानंतर जलवाहिनीच्या कामाची जाग पालिका प्रशासनास आल्याने नागरिकांनी देखील प्रशासनाचा निषेध नोंदविला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT