Kalyan-Dombivli Brown sugar seller drug mafia old women arrested crime mumbai Sakal
मुंबई

कल्याण-डोंबिवलीत तरूणाई धोक्याच्या उंबरठ्यावर; ब्राऊन शुगर विक्रेत्या ड्रग्ज माफिया वृद्धेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कचोरे गावातील हनुमान नगर परिसरातून टिळकनगर पोलिसांनी ड्रग्ज माफिया वृद्धेला सापळा लावून बेड्या ठोकल्या आहेत.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कचोरे गावातील हनुमान नगर परिसरातून टिळकनगर पोलिसांनी ड्रग्ज माफिया वृद्धेला सापळा लावून बेड्या ठोकल्या आहेत. सलमाबेगम नूर मोहम्मद शेख (वय 32) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ड्रग्जच्या आहारी गेलेली कल्याण-डोबिवलीतील तरूणाई धोक्याच्या उंबरठ्यावर असल्याचे कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

ब्राऊन शुगर विक्रेत्या या महिलेकडून तरूणांसह विद्यार्थ्यांना ड्रग्जचा पुरवठा केला जात होता. उशिरा का होईना पोलिसांनी कारवाई केल्याने पालक वर्ग समाधान व्यक्त करत आहे. सलमाबेगम हिला यापूर्वी 2015 मध्ये ड्रग्ज विक्री प्रकरणात अटक करण्यात आली होती.

सलमाबेगमवर टिळकनगर पोलिसांनी महिनाभर गुप्त नजर ठेवली होती. ड्रॅग्जच्या साठ्यासह संपूर्ण माहिती मिळताच राहत असलेल्या परिसरात सापळा लावून सलमाबेगमला अटक करण्यात आली.

तिच्याकडून 104 ग्रॅम वजनाची ब्राऊन शुगर जप्त केली. सलमाबेगम हे ड्रॅग्ज कुठून आणत होती ? कुणाला विक्री करत होती ? याचा तपास टिळकनगर पोलिस करत आहेत. कल्याण पूर्वेतील हनुमाननगर परिसरात राहणारी 62 वर्षीय सलमाबेगम शेख ड्रग्ज विक्री करत असल्याची पक्की खबर पोलिसांना मिळाली होती.

विद्यार्थी आणि तरुणांना हीच सलमाबेगम ड्रग्जची विक्री करत होती. 2015 मध्ये सलमा बेगमला याच टिळकनगर पोलिसांनी रंगेहाथ बेडा ठोकल्या होत्या. जेलमधून सुटल्यानंतर तिने पुन्हा हाच धंदा सुरू केला.

वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय कदम यांनी या संदर्भातील माहिती पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि सहाय्यक पाेलिस आयुक्त सुनिल कुराडे यांना दिली. सलमाबेगमला रंगेहात पकडण्याकरिता पोलिसांचे स्वतंत्र पोलिस पथक नेमले गेले.

पोलिस अधिकारी मोतीराम बगाड, अजित राजपूत आणि विनोद बच्छाव यांना सलमाबेगमवर पाळत ठेवण्याची जबाबदारी दिली. पोलिस त्याच परिसरातील एका शाळेच्या छतावर जाऊन पाळत ठेवून होते. सलमा काय हालचाली करते ?

तिला कोण भेटायला येतात ? याची संपूर्ण माहिती पोलिसांनी संकलित केल्यानंतर तिला रंगेहाथ पकडले. सलमाकडून 104 मार्फीन ड्र्ग्ज हस्तगत केले आहे. त्याची बाजारातील किंमत 5 लाख 50 हजार रुपये आहे. सलमा हिला ड्रग्ज कुणाकडून पुरविले जात होते ?

कोणाकडून ते विकत घेत होती ? कोणत्या शाळा-कॉलेजमधील किती विद्यार्थ्यांना सलमा आणि तिच्या टोळीने लक्ष्य केले आहे ? आदी प्रश्नांची उकल करण्यासाठी टिळकनगर पोलिसांनी विशेष तपास सुरू केला आहे. तरूण पिढीला नशेच्या आहारी लावून त्यांचे भवितव्य धोक्यात घालणाऱ्या बदमाश्यांच्या विरोधात ठोस कारवाई व्हायला हवी, अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT