मुंबई

कल्याण-डोंबिवलीकरांना पाणी दरवाढीपासून दिलासा 

सकाळवृत्तसेवा

कल्याण - कल्याण-डोंबिवलीकरांना पाणीपट्टी दरवाढीला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता असतानाच बुधवारी मात्र या दरवाढीपासून नागरिकांना दिलासा मिळाला. पाणीपुरवठा विभागाने 2019-20 या आर्थिक वर्षासाठी सुचवलेली घरगुती पाणी दरवाढ स्थायी समितीने एकमताने नामंजूर केली. मात्र बिगर घरगुती पाणी दरवाढीच्या प्रस्तावामध्ये फेरबदल करत ती मंजूर करण्यात आली. त्यामुळे व्यावसायिकांना मात्र जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. 

बुधवारच्या स्थायी समितीमध्ये 2019-20 या वर्षासाठी पाणीपुरवठा विभागाने सुचविलेल्या पाणी दरवाढीचा विषय चांगलाच गाजला. स्थायी समितीमध्ये पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी माहिती देताच सभापती दीपेश म्हात्रे यांच्यासमवेत वामन म्हात्रे, नीलेश शिंदे, संदीप पुराणिक व इतर सदस्यांनी पाणीचोरी विषयावर प्रशासनाला कोंडीत पकडले. नीलेश शिंदे यांनी कल्याण पूर्वेकडील समस्या मांडली, तर नळातून पाण्याऐवजी हवा येते, दूषित पाणी येते. नागरिक त्याची पाणीपट्टी देतात. त्यामुळे पाणीपट्टी वाढविणे योग्य नसल्याचे सांगत वामन म्हात्रे यांनी अनधिकृत नळजोडणी आणि पाणी चोरीबाबत पोलखोल केली. या वेळी संदीप पुराणिक आणि मनोज राय यांच्यासमवेत इतर सदस्यांनी घरगुती पाणीपट्टी दरवाढीला विरोध दर्शविला, तर सभापती दीपेश म्हात्रे यांनीही विरोध करत भविष्यातील पाणीटंचाई पाहता स्वतःचे धरण उभारण्यासाठी पाठपुरावा करा, पाणी बचतीबाबत पाठपुरावा करा, अशा मागण्या केल्या. या वेळी बिगर घरगुती पाणी दरवाढ आणि टॅंकरने केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी दरवाढ मंजूर करण्यात आली. 

अशी असेल दरवाढ 
- आगामी वर्षासाठी धार्मिक स्थळ, खासगी शाळा, सर्व महाविद्यालयांसाठी प्रति घनमीटर 20 रुपये असा प्रस्ताव होता. तो कमी करत 15 रुपये प्रति घनमीटर दर करण्यात आला आहे. 
- किराणा स्टोअर्स, ज्वेलर्स, चहा टपरी, छोटे दुकान, पोळी-भाजी केंद्र, नाट्यगृह, पेट्रोल पंप आदींना प्रति घनमीटर 30 रुपये दर घ्यावा, असा प्रस्ताव होता. त्याला मंजुरी देण्यात आली. 
-1 ते 16 खाटांच्या हॉस्पिटलसाठी दरवाढ 30 रुपये प्रति घनमीटर 
- 16 पेक्षा अधिक खाटांचे हॉस्पिटल, छोटे कारखाने, सरकारी-निमसरकारी कार्यालय यांना दरवाढ प्रति घनमीटर 50 रुपये प्रस्तावित करण्यात आली होती. त्यात 10 रुपयांनी वाढ करत ती आता 60 रुपये करण्यात आली. 
- बार, परमिट रूम, उपाहारगृह, मंगल कार्यालय, लॉजिंग बोर्ड, कारखाने, इमारत बांधकाम यांना प्रति घनमीटर 50 रुपये दरवाढीचा प्रस्ताव होता. त्याला वाढ देत आता 60 रुपये प्रति घनमीटर असा दर करण्यात आला. 

टॅंकरद्वारे पाणीपुरवठ्याचे दर 
जेथे पाणी समस्या आहे, तेथे टॅंकरने मोफत पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र कार्यक्रम, हॉटेल्स, बांधकाम यांना टॅंकरने पाणी मागितले जाते. त्याला आगामी वर्षात घरगुती वापरासाठी प्रतिटॅंकर 800 रुपये दराचा प्रस्ताव होता. या दरात घट करत आता 400 रुपये दर घ्यावा, तर बिगर घरगुती वापरासाठी प्रतिटॅंकर 1230 रुपये दर प्रस्तावित होता. त्यात वाढ करून आता प्रतिटॅंकर 2000 रुपये दर करण्यात आला. शाळा-महाविद्यालयांना टॅंकरने पाणी मोफत न देता प्रतिटॅंकर 640 रुपये घ्यावे, असाही प्रस्ताव मंजूर करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT